Thursday, September 17, 2026

PM Modi birthday wishes : क्रीडा जगताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७६ व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा

PM Modi birthday wishes : क्रीडा जगताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७६ व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा

नवी दिल्ली : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला ७६ वा वाढदिवस साजरा करत असून, यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेषतः भारतीय क्रीडाविश्वातील अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, अशी प्रार्थना केली आहे.(PM Modi birthday wishes)

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट दिग्गजांकडून शुभेच्छा

भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राप्रती असलेल्या समर्पणाची प्रशंसा केली. त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा त्याने व्यक्त केल्या.

  • सौरव गांगुली: बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनीही पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन केले.

  • गौतम गंभीर व युवराज सिंग: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मोदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तर भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांनी, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने भारताला अधिक मजबूत आणि प्रगतीशील भविष्याकडे नेल्याचे सांगत त्यांना आगामी वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या.(PM Modi birthday wishes)

  • सुरेश रैना व व्यंकटेश प्रसाद: सुरेश रैना यांनी देशाप्रती पंतप्रधानांचे समर्पण लाखो लोकांना प्रेरणा देत असल्याचे म्हटले. तसेच माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी मोदींची ऊर्जा, शिस्त आणि देशाप्रती असलेली वचनबद्धता अत्यंत प्रेरणादायी असल्याचे वर्णन केले.

ऑलिम्पिक पदक विजेते आणि इतर खेळाडूंचा सन्मान

क्रीडा क्षेत्रातील या उत्स्फूर्त शुभेच्छांमुळे प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिवसाचा सोहळा अधिकच खास ठरला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >