
एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धा 19 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी भारत ए संघाच्या 15 सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. कर्णधारपद तिलक वर्माकडे असून उपकर्णधारपदाची धुरा रजत पाटीदारच्या खांद्यावर आहे. तर वैभव सूर्यवंशीलाही या संघात स्थान मिळालं आहे. या व्यतिरिक्त अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह, तिलक वर्मा, रजत पाटीदार आणि रिंकु सिंह यांनाही संघात स्थान मिळालं आहे. विकेटकीपर म्हणून संघात प्रभसिमरन सिंह आणि कुमार कुशाग्र असणार आहेत. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 20 नोव्हेंबर रोजी नेपाळशी होणार आहे. त्यानंतर 22 नोव्हेंबरला पाकिस्तान ए संघाविरुद्ध लढत होईल. तर 24 नोव्हेंबर ग्रुप फेरीतील शेवटचा सामना युएईविरुद्ध होईल. भारताचे तिन्ही सामने दोहामध्ये होणार आहेत. नेपाळ आणि पाकिस्तान ए विरुद्धचे सामने वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आहे.
भारत ए 15 सदस्यीय संघ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), रिंकू सिंह, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिंस यादव आणि अरशद खान.
🚨 News 🚨
India A squad for upcoming ACC Rising Stars Asia Cup announced 📝 More details ▶️ https://t.co/JRdPQ31UPA #RisingStarsAsiaCup https://t.co/4k2vJAE4kh — BCCI (@BCCI) November 2, 2026
रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धा काय आहे? यात इंडिया ए संघ का खेळतो?
रायझिंग स्टार आशिया कप ही स्पर्धा एशियन क्रिकेट काउंसिलची स्पर्धा आहे. ही स्पर्धा यापूर्वी इमर्जिंग आशिया कप नावाने ओळखली जात होती. या स्पर्धेच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान देण्याचा हेतू आहे. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांच्या ए संघ भाग घेतात. म्हणजे राष्ट्रीय संघाच्या ठिक खालच्या स्तरातील संघ यात खेळतो. ही स्पर्धा 50 षटकांची होणार आहे. मागच्या पर्वात ही स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये झाली होती.
भारत न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका बुधवारपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर होणार आहे. या मैदानावर ...
आठ संघ आणि दोन गट, भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान
या स्पर्धेत एकूण 8 संघ भाग घेणार असून चार-चार संघाचे दोन गट तयार केले आहेत.
- ग्रुप-A: बांग्लादेश-A, श्रीलंका-A, अफगानिस्तान-A आणि हॉन्गकॉन्ग-चीन.
- ग्रुप-B: भारत-A, पाकिस्तान-A, नेपाल आणि युएई





