Unique Foldable Bappa Idol : मुंबईच्या कलाकाराची कमाल! अमेरिकेतील बाप्पासाठी बनवली अनोखी 'फोल्डेबल' गणेशमूर्ती!

मूर्तिकार आशिष पाटकर यांनी साकारलेला 'न्यू जर्सीचा राजा' अमेरिकेत विराजमान


मुंबई : सागरी सफरीचा महिनाभराचा टप्पा पार करत मुंबईहून अमेरिकेत पोहोचलेल्या 'न्यू जर्सीच्या राजा'ची नुकतीच अत्यंत दिमाखात आणि विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गावदेवी येथील नामांकित मूर्तिकार आशिष पाटकर यांनी घडवलेली ही १४ फूट उंच, देखणी आणि अनोखी गणेशमूर्ती सध्या न्यू जर्सीतील भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.



फोल्डेबल फायबर मूर्तीचे तंत्रज्ञान


परदेशात गणेशमूर्ती सुरक्षित पोहोचवणे हे मोठे आव्हान असते. यावर मात करत मूर्तिकार आशिष पाटकर यांनी अत्यंत कल्पकतेने ही मूर्ती पूर्णपणे फोल्डेबल स्वरूपात तयार केली आहे. मूर्तीचा पोटाखालील भाग, पोटावरील भाग आणि उर्वरित रचना अशा तीन स्वतंत्र भागांत ही मूर्ती फायबरपासून घडवण्यात आली आहे. लोखंडी अँगलचा भक्कम गाभा तयार करून 'मेल-फिमेल' जोडणी पद्धतीने हे तिन्ही भाग एकत्र जोडले जातात, ज्यामुळे १४ फूट उंच मूर्ती अगदी सहजरीत्या उभी राहते. ही मूर्ती साकारण्यासाठी पाटकर यांना सुमारे दोन महिने लागले. प्रथम मातीतून मुख्य रचना तयार करून तिचा साचा बनवण्यात आला. त्यानंतर फायबरमध्ये भाग ढालून अत्यंत बारकाईने फिनिशिंग, पॉलिशिंग आणि पेंटिंगचे काम पूर्ण करण्यात आले.



अमेरिकेत ९ वर्षांची परंपरा


आशिष पाटकर गेल्या नऊ वर्षांपासून 'न्यू जर्सीच्या राजा'साठी विविध भव्य आणि मनमोहक रूपांतील गणेशमूर्ती साकारत आहेत. याआधी त्यांनी गेल्या वर्षी २२ फूट उंचीची सिद्धिविनायकाची भव्य मूर्ती आकर्षक मखरासहित अमेरिकेत पाठवली होती.



तीन पिढ्यांचा समृद्ध वारसा


गेल्या २५ वर्षांपासून मूर्तिकलेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पाटकर कुटुंबाला या कलेचा मोठा वारसा लाभला आहे. "हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'जीएसबी'चा (GSB) महागणपती मी आणि माझे बंधू अविनाश पाटकर गेल्या तीन पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने शाडू मातीपासून स्वतः घडवतो," अशी माहिती आशिष पाटकर यांनी आवर्जून दिली.



पिरियन भाईंचा पुढाकार आणि उत्सवाचा उत्साह


न्यू जर्सीत मूर्ती कार्गो जहाजाद्वारे दाखल झाल्यानंतर तेथील स्थानिक पारसी नागरिक 'पिरियन भाई' अत्यंत आत्मीयतेने पुढाकार घेतात. पुरोहितांच्या हस्ते रीतसर पूजा-अर्चा करून एका मोठ्या सभागृहात या गणरायाची स्थापना केली जाते. यानंतर अमेरिकेतील सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. सध्या 'न्यू जर्सीच्या राजा'च्या दर्शनासाठी तेथील सभागृहात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.

Comments
Add Comment

Asian Games 2026 : एशियन गेम्समध्ये भारताचा डंका! मनू भाकर आणि तजिंदरपाल सिंग तूर भूषवणार ध्वजधारकाचा मान

जपानमधील नागोया येथे होणाऱ्या 'आशियाई खेळ २०२६' च्या (Asian Games 2026) भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजधारक म्हणून

Pitbull Attack : बाळाला कडेवर घेऊन बाहेर पडताच पिटबुलचा भयानक हल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

सोनीपत : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात पाळीव पिटबुल कुत्र्याने 6 महिन्यांच्या बाळावर हल्ला केल्याची धक्कादायक

Darjeeling honeymoon accident : दार्जिलिंगमध्ये हनिमूनदरम्यान भीषण अपघात: होमस्टेमध्ये शेकोटी पेटवताना नववधू गंभीर भाजली; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

दार्जिलिंग : दार्जिलिंगच्या सुंदर टेकड्यांमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या एका नवविवाहित दांपत्याच्या आनंदावर

Semicon India 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत 'सेमिकॉन इंडिया 2026' चे भव्य उद्घाटन; सेमीकंडक्टर अभियानाच्या १३.५ अब्ज डॉलरच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'सेमिकॉन इंडिया 2026' परिषदेचे दिमाखदार उद्घाटन

Indian youth death abroad : अमेरिकेत हैदराबादच्या २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांची केंद्र सरकारकडे आर्त हाक

चेन्नई: अमेरिकेतून एक अत्यंत दुःखद

Yudh Abhyas 2026: डोंगरात युद्धाचा सराव! भारत-अमेरिकेचे जवान, ड्रोन आणि रोबोटिक डॉग मैदानात

औली (उत्तराखंड) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘युद्ध अभ्यास २०२६’ सध्या चर्चेत आला आहे.