PAT Exam: ‘पीएटी’ परिक्षेची तारीख आली, विद्यार्थ्यांनो लागा तयारीला...

राज्यातील शाळांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एकची परिक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेला लागण्याचे आवाहन केले आहे.

अहिल्यानगर: राज्यातील शाळांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक आता डिसेंबर महिन्यात होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती. मात्र, दिवाळीच्या दीर्घ सुट्टीनंतर लगेचच परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची उजळणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, तसेच सुट्टीनंतर काही विद्यार्थी शाळेत उशिरा हजर झाल्यास ते परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती.



सर्व बाबींचा विचार करून शिक्षक भारती संघटनेने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली होती. शिक्षक भारती संघटनेच्या या मागणीला यश आले असून, आता ही परीक्षा 2, 3 आणि 5 डिसेंबर 2026 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव सुनील गाडगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होणे आवश्यक आहे.



दिवाळीच्या दीर्घ सुट्टीनंतर लगेच परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुरेशी तयारी करता येणार नाही. तसेच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सुट्टीनंतर काही दिवस उशिराने शाळेत दाखल होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये आणि सर्व विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, या भूमिकेतून शिक्षक भारतीने ही मागणी केली होती. शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांच्या या रास्त मागणीची दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:  चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री

पाणी टंचाईतील थकित बिले तातडीने देण्याचे निर्देश; चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

केंद्राकडून मच्छिमारांसाठी 'एनडीआरएफ'च्या मदतीत वाढ

मुंबई: नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणाची नांदी

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात एक नवे समीकरण

शेतमाल 50 किलोच्या मर्यादेतच आणा, बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन; गमाल-मापाड्यांच्या मागण्यांवर निर्णय

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगरच्या भुसार, भाजीपाला आणि नेप्ती उपबाजार आवारातील

अहिल्यानगर जिल्ह्यात 13 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन, 20 कारखान्यांकडून 16.61 लाख टन उसाचे गाळप

अहिल्यानगर: राज्यात 2026-27 च्या ऊस गाळप हंगामाला वेग आला असून, यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच अहिल्यानगर