अहिल्यानगर (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगरच्या भुसार, भाजीपाला आणि नेप्ती उपबाजार आवारातील कांदा विक्रीसाठी शेतमाल आणताना 50 किलो वजनाच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब नानासाहेब बोठे यांनी शेतकरी बांधवांना केले आहे. यापुढे भुसारमाल, भाजीपाला आणि कांदा विक्रीसाठी आणताना 50 किलो वजनाच्या आतील गोणी, कॅरेट किंवा पिशव्यांचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाने राज्यभर 50 किलो वजनाच्या मर्यादेची अंमलबजावणी करण्यासह एकूण नऊ मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील बाजार समित्यांचे कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत कार्यालयाचे 3 नोव्हेंबर 2026 रोजीचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित १२ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात विद्यार्थी, वाहनधारक, आणि ...
राज्याच्या पुणे येथील पणन संचालनालयातर्फेही 2 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निर्देशानुसार कांदा, बटाटा व अन्य शेतमालाची 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या नायलॉन (प्लास्टिक) पिशव्यांमधून चढ-उतार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या भुसार यार्डमध्ये भुसारमाल, भाजीपाला यार्डमध्ये भाजीपाला, तर नेप्ती उपबाजार आवारात कांदा विक्रीसाठी आणताना 50 किलोच्या आतील वजनाच्या गोणी, कॅरेट किंवा पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन सभापती बोठे यांनी केले आहे.