Darjeeling honeymoon accident : दार्जिलिंगमध्ये हनिमूनदरम्यान भीषण अपघात: होमस्टेमध्ये शेकोटी पेटवताना नववधू गंभीर भाजली; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

दार्जिलिंग : दार्जिलिंगच्या सुंदर टेकड्यांमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या एका नवविवाहित दांपत्याच्या आनंदावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर दिनाजपूर येथील निकिता साहा आणि सौविक दास हे दोघे लग्नानंतर फिरायला गेले होते. मात्र, सिट्टाँग येथील एका होमस्टेमध्ये शेकोटी (बोनफायर) सुरू असताना झालेल्या भीषण अपघातात नववधू निकिता अतिशय गंभीररीत्या भाजली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पती सौविक दास यांनी पोलिसांत धाव घेत होमस्टे मालक आणि निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.



अन् काही क्षणात आनंदाचे रुपांतर आगीच्या तांडवात झाले (Darjeeling honeymoon accident)


सौविक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते दोघे सिट्टाँग येथील 'ऑरा होमस्टे'मध्ये पोहोचले होते. दिवसभर फिरल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास दोघेही होमस्टेच्या आवारात शेकोटीभोवती बसले होते. तितक्यात तिथल्या एका कर्मचाऱ्याने आग वाढवण्यासाठी कोणत्याही सुरक्षेची काळजी न घेता एक ज्वलनशील रासायनिक द्रव थेट जळत्या आगीत ओतले. द्रव ओतताच आगीचा भडका उडाला आणि प्रचंड ज्वाळा थेट निकिताच्या अंगावर पसरल्या. पत्नीला वाचवण्याच्या धडपडीत सौविक यांच्या हातालाही गंभीर दुखापत झाली.






सुरक्षा यंत्रणा आणि प्रथमोपचाराचा पूर्ण अभाव


या अपघातामुळे होमस्टे प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आगीची एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही तिथे विझवण्यासाठी कोणतेही अग्नीशामक यंत्र (फायर एक्स्टिंग्विशर) उपलब्ध नव्हते. तसेच तातडीने प्रथमोपचार किंवा वैद्यकीय मदत देण्यासाठीही कोणी पुढे आले नाही. अपघातानंतर जवळपास पाऊण ते एक तास हे दांपत्य वेदनेने तडफडत तिथेच अडकून पडले होते. नंतर कुटुंबाने होमस्टेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्यात ही संपूर्ण घटना स्पष्टपणे कैद झाली आहे.



तीन तासांचा खडतर प्रवास; नववधू मृत्यूशी झुंज देत आहे (Darjeeling honeymoon accident)


होमस्टेकडून कोणतीही वाहतूक किंवा रुग्णवाहिका न मिळाल्याने सौविक यांनी स्वतः निकिताला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. तीन तासांचा लांबचा प्रवास करून त्यांनी आधी सिलीगुडीच्या आनंदलोक रुग्णालयात आणि नंतर प्रकृती अधिक बिघडल्याने देसुन रुग्णालयात तिला दाखल केले. डॉक्टरांच्या मते निकिताची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ती सध्या व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे.



पतीने केली हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


या प्रकरणी सौविक दास यांनी १६ सप्टेंबर रोजी कुर्सेआँग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी होमस्टे व्यवस्थापन आणि त्या कर्मचाऱ्याविरोधात तात्काळ एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. "हा केवळ अपघात नसून माझ्या पत्नीच्या जिवाशी खेळलेला हत्येचा प्रयत्न आहे," असा गंभीर आरोप सौविक यांनी केला आहे. सध्या पोलीस या तक्रारीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत असून घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या