iPhone 18 Pro : iPhone 18 Pro ची भारतात विक्री सुरू! खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, बेंगळूरमध्ये रात्रीपासूनच ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांचा रांगा

मुंबई : ॲपलच्या नव्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची विक्री सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. देशातील दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक ॲपल स्टोअरबाहेर रांगेत उभे असल्याची माहिती समोर आली आहे. काही ग्राहकांनी तर रात्रीपासूनच स्टोअरबाहेर थांबून फोन खरेदीची तयारी केली आहे.

नवीन आयफोनच्या खरेदीसाठी Apple Store बाहेर ग्राहकांची गर्दी


दिल्लीतील साकेत येथील Select Citywalk मॉलमधील ॲपल स्टोअरबाहेर सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी वाढली. अजय नावाच्या ग्राहकाने iPhone 18 Pro Max चे 1TB मॉडेल आधीच प्री-बुक केल्याचं सांगितलं. सध्या ते iPhone 17 Pro वापरत असून, नव्या मॉडेलमध्ये कोणते बदल आणि नवीन फीचर्स मिळणार आहेत, याची त्यांना उत्सुकता आहे.



टेक रिव्ह्यू चॅनल चालवणारे सूरज चौहान हे देखील नवीन आयफोन घेण्यासाठी स्टोअरबाहेर रांगेत उभे होते. स्मार्टफोनमध्ये आपल्याला विशेष रस असल्याचं सांगत त्यांनी यापूर्वी iPhone 17 Pro घेतल्याचं नमूद केलं. यावेळी iPhone 18 Pro Max घेण्यासाठी आलो असून, कॅमेरा आणि फोनच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेरही ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. काही ग्राहक संपूर्ण रात्र स्टोअरबाहेर थांबले होते. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक आल्याने स्टोअर परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.


नवीन iPhone 18 Pro आणि Pro Max मधील फीचर्स, कॅमेरा आणि परफॉर्मन्समध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत, याकडे आता ग्राहकांचं लक्ष लागलं आहे.
Comments
Add Comment

Olympia Coffee House : मुंबईतील प्रसिद्ध ऑलिम्पिया कॉफी हाऊसवर FDA ची कारवाई; अस्वच्छता आढळल्याने परवाना निलंबित

अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई; 14 खाद्य आस्थापनांवर निलंबनाची कारवाई मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर

National Pension Scheme : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना

स्थायी समितीने दिली पेन्शन योजनेला मंजुरीची दावे महापालिका मंजूर करणार, अधिदान एनएसडीएल काढणार मुंबई (विशेष

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी म्हणाले...

सीबीआयच्या नव्या FIR नंतर प्रकरण पुन्हा चर्चेत मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने

Mumbai Banganga Aarti : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मलबार हिलच्या ऐतिहासिक बाणगंगा येथे महाआरती संपन्न; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :

Mumbai News: नवीन वर्षात राणीबागेत घुमटाकार मत्स्यालयाचे होणार लोकार्पण, कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात नव्याने उभारण्यात

Sion station update : शीव येथील रेल्वेचा पूल नोव्हेंबरपासून सेवेत? येत्या १५ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाची केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम