Eknath Shinde : 'मी गावी आलो, दिल्लीत किंवा लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखीच'; दरे गावातून उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

सातारा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या 'दरे' या मूळ गावी पोहोचलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी गावी आलो, दिल्लीला गेलो किंवा लंडनच्या दौऱ्यावर गेलो, तरी विरोधकांच्या पोटात उगाचच दुखायला लागते. त्यामुळे आता या राजकीय 'पोटदुखी'वर औषध म्हणून एखादे झाड शोधावे लागेल किंवा त्यांना थेट 'जमाल गोटा'च द्यावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी फिरकी घेतली. टीका टिप्पणीला आरोपांनी नव्हे, तर प्रत्यक्ष काम करूनच उत्तर देणे योग्य ठरेल, कारण मी केवळ कामाचा माणूस आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मी कोणत्याही कारणाने नाराज नसून केवळ सणाच्या निमित्ताने गावी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



जागतिक बांबू लागवड दिनाचे औचित्य साधून शिंदेंनी आपल्या शेतात बांबूची लागवड केली. याप्रसंगी बोलताना त्यांनी बांबूच्या वाढत्या महत्त्वाची माहिती दिली. बांबूचा उपयोग आता केवळ साध्या वस्तूंसाठी उरलेला नसून त्यापासून इथेनॉल निर्मिती, विमानतळांचे बांधकाम आणि इतर अनेक उपयुक्त वस्तू बनविल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबूच्या लागवडीवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. शिंदेंनी आपल्या शेतात कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग केले असून, त्यात सफरचंद आणि ब्ल्यू बेरीच्या यशस्वी उत्पादनानंतर आता कापूर आणि हिंगाच्या रोपांची नवीन लागवड केली आहे. विशेष म्हणजे, आजवर परदेशातून आयात करावी लागणारी ब्ल्यू बेरी आता महाराष्ट्राच्या मातीत पिकवता येऊ शकते, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.


राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. ज्या भागात पावसाच्या ओढीमुळे किंवा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे आणि पिके करपून गेली आहेत, तिथे तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री सध्या या बाधित क्षेत्रांची पाहणी करत असून, आपण स्वतः लवकरच या दुष्काळी भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Thane News : ठाण्यात भीषण दुर्घटना! ५ झोपड्यांना आग लागून सिलिंडरचा स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

ठाण्यातील कळवा (पश्चिम) भागात शुक्रवारी सकाळी आगीची एक मोठी दुर्घटना घडली. खारेगाव पुलाजवळ आणि सहयोग

Spy Thriller Series : एक कम्प्युटर कोड अन् देशाला धोका! ‘धुरंधर’नंतर ओटीटीवरील ही एमी विजेती सीरिज तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवेल

मुंबई : धुरंधरमधला थरार, गुप्त मिशन्स आणि शत्रूविरोधात खेळले जाणारे बौद्धिक खेळ आवडले असतील, तर ओटीटीवरील

Nashik Water Supply : नाशिकमध्ये पाणीपुरवठा मजबूत होणार; 6 नवीन जलकुंभांसाठी 28 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Nashik Water Supply : नाशिक शहराचा विस्तार वेगाने होत असताना वाढत्या उपनगरांमधील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी

Gondhal Movie: लग्नाची रात्र, गूढ रहस्य अन् जुनं वैर! Oscar 2027 च्या शर्यतीत गेलेल्या ‘गोंधळ’च्या कथेत नेमकं काय?

मुंबई: ९९ व्या अकादमी पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ऑस्कर २०२७ मध्ये 'गोंधळ' या मराठी चित्रपटाला

Dashmi Marathi Movie : रुपेरी पडद्यावर पुन्हा उमलणार बाप-लेकीचं भावनिक नातं! मकरंद अनासपुरे-गौरी इंगवलेचा 'दशमी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘दे धक्का 2’मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर! मुंबई : बाप-लेकीचं नातं, मुलीच्या स्वप्नांसाठी वडिलांची

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि