अभिमानास्पद! Oscar 2027 च्या शर्यतीत मराठी चित्रपटाची निवड

मुंबई: मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी अभिमानाची बातमी समोर येत आहे. २०२५ मध्ये रिलीज झालेला संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' चित्रपटाची (Gondhal Movie) ऑस्कर 2027च्या शर्यतीमध्ये निवड करण्यात आली आहे (Oscar 2027). हा मराठी सिनेमा परदेशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्राची लोककला आणि गोंधळ या दोन परंपरेचं चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आलं आहे. महाराष्ट्राची संस्कृती परदेशातल्या नागरिकांनाही पुन्हा एकदा पाहता येणार आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर करोडोंची उड्डाणे घेतलेला हा चित्रपट आता ऑस्करमध्येही नक्कीच आपली जादू दाखवेल, यामध्ये शंका नाही. (Marathi Movie)



९९ व्या अकादमी पुरस्कारांसाठी अर्थात ऑस्कर २०२७ साठी (99th Academy Awards) 'गोंधळ'चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ही बाब खरंतर फक्त 'गोंधळ'चित्रपटाच्या टीमसाठी आनंददायी नसून संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी आनंदाची बातमी आहे. 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटगरीसाठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून 'गोंधळ' चित्रपट ऑस्कर २०२७ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. स्थानिक संस्कृतीवर आधारित असलेल्या 'गोंधळ'चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

महाराष्ट्रामध्ये 'गोंधळ' ही परंपरा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. गाव खेड्यापासून अगदी शहरातही गोंधळ घातला जातो. महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना गोंधळ हा प्रकार माहित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीशी जुळलेला हा विषय पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणार आहे. लग्नानंतर वधु- वराच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या ‘गोंधळ’ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहाणारी कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहाता अंधश्रद्धा, कुटुंबातील नात्यांचे संघर्ष, समाजात बदलणारे दृष्टिकोन आणि माणसांच्या मनात दडलेला रहस्याचा धागा यांचाही वेध घेते. (Maharashtrian Culture)



चित्रपटाचा विषय, दिग्दर्शन, निर्मिती आणि चित्रपटातील अनेक महत्त्वाच्या बाजू या सर्वांमुळे ‘गोंधळ’ चित्रपट मराठी संस्कृती जागतिक प्रेक्षकांसमोर ताकदीने सादर करणारा ठरतोय. याआधी फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२६, इफ्फीमध्ये सिल्व्हर पिकॉक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, फिप्रेस्को पुरस्कार, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ्फ), झी चित्र गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवलेल्या ‘गोंधळ’ चित्रपटाची जादू ९९ व्या अकादमी पुरस्कारामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाने देशासह परदेशातही दमदार ठसा उमटवत मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

">‘गोंधळ’ चित्रपटा
ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती डावखर फिल्म्सने केली. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 
Comments
Add Comment

Dashmi Marathi Movie : रुपेरी पडद्यावर पुन्हा उमलणार बाप-लेकीचं भावनिक नातं! मकरंद अनासपुरे-गौरी इंगवलेचा 'दशमी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘दे धक्का 2’मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर! मुंबई : बाप-लेकीचं नातं, मुलीच्या स्वप्नांसाठी वडिलांची

Diler Kharkiya : रेंज रोव्हरवर गोळीबार अन् थेट धमकी! 'दिलेर खरकिया'वरील हल्ल्याने हरियाणात खळबळ

Diler Kharkiya : हरियाणवी गायक आणि अभिनेता दिलेर खरकियाच्या रेंज रोव्हरवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. भिवानीतील

Rajpal Yadav Cheque Bounce Case : ‘कोर्टात अभिनय करू नका’....ही शेवटची संधी म्हणत सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादवांना सुनावलं

Rajpal Yadav Cheque Bounce Case : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी अद्याप कायम आहेत. चेक बाऊन्स आणि कर्जाच्या प्रकरणात

Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी... मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

[caption id="attachment_1059712" align="aligncenter" width="728"] प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र

Mumbai Filmcity News: फिल्मसिटीमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण

मुंबई: मुंबईतील गोरेगावमध्ये फिल्म सिटी अर्थात चित्रनगरी आहे. या चित्रनगरीमध्ये मराठीसह हिंदी भाषेतील

Maharashtrachi Hasyajtra News: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचं अपघाती निधन, टीमवर कोसळला दु:खाचा डोंगर

मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं जातं. या शोचे फक्त