Nashik Ring Road : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक रिंग रोडच्या कामाला वेग ! सातही पॅकेजमध्ये काम सुरू

Nashik Ring Road : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बहुचर्चित परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोडच्या कामाला अखेर वेग आला आहे. तब्बल 66 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड सात टप्प्यांत अर्थात पॅकेजमध्ये बांधण्यात येत असून, आता सातही टप्प्यांमध्ये काम सुरू झाल्याची माहिती नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून ( Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority ) देण्यात आली आहे. दरम्यान, भूसंपादनासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला ( Nashik District Collector's Office )आणखी 500 ते 550 कोटी रुपयांचा निधी चालू सप्ताहात उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.



25 गावांतून जाणार 66 किमीचा रिंग रोड


नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात नाशिक परिक्रमा मार्गाला अर्थात रिंग रोडला मान्यता देण्यात आली आहे. हा सुमारे 66 किलोमीटरचा मार्ग 25 गावांतून जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 365 एकर खासगी जमीन संपादित करण्यात येत आहे. मात्र, मोजणी, मोबदला आणि रस्त्याच्या संरेखनासह विविध मुद्द्यांवर काही शेतकऱ्यांनी हरकती घेत आंदोलनं केली होती.



24 गावांत थेट खरेदीचे प्रस्ताव


कुंभमेळ्याला आता कमी कालावधी शिल्लक असल्याने प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी संवाद साधत भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोवर्धन वगळता उर्वरित 24 गावांमध्ये थेट खरेदीचे दर निश्चित करून त्यासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. तर सक्तीच्या भूसंपादनाचे अवॉर्ड आतापर्यंत आठ गावांमध्ये जाहीर झाले असून, इतर गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात एमएसआयडीसीच्या माध्यमातून खासगी वाटाघाटी करून थेट खरेदी पद्धतीनेही जमीन संपादन सुरू आहे.



आतापर्यंत 100 हेक्टरपेक्षा अधिक जमीन खरेदी


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास एक हजार कोटी रुपये किमतीची 100 हेक्टरपेक्षा अधिक जमीन थेट खरेदी पद्धतीने संपादित करण्यात आली आहे. आडगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. भूसंपादन प्रक्रियेतील अडचणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून सोडवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. उर्वरित अडचणी आणि प्रश्नांवर जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी एकत्रितपणे तोडगा काढतील, असं कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह ( Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांनी स्पष्ट केलं.



सातही पॅकेजमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात


भूसंपादन प्रक्रियेला वेग आल्यानंतर रिंग रोडच्या सर्व सात पॅकेजमध्ये काम सुरू झालं आहे. यापूर्वी काही टप्प्यांमध्ये काम सुरू होतं; मात्र अलीकडे आणखी एक-दोन टप्प्यांमध्ये कामाला सुरुवात झाली आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या माहितीनुसार, नाशिक परिक्रमा मार्गाचं काम आता सातही टप्प्यांमध्ये सुरू झालं असून ही समाधानाची बाब आहे.


दरम्यान, भूसंपादनासाठी मोबदला वितरणाची अंतिम टप्प्यातील प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागणीनुसार चालू सप्ताहात 500 ते 550 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. उर्वरित अवॉर्डसाठी निधीची मागणी प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचंही सिंह यांनी सांगितलं.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण