Nashik Water Supply : नाशिकमध्ये पाणीपुरवठा मजबूत होणार; 6 नवीन जलकुंभांसाठी 28 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Nashik Water Supply : नाशिक शहराचा विस्तार वेगाने होत असताना वाढत्या उपनगरांमधील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्राच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ (UCF) अंतर्गत शहरातील विविध भागांत सहा नवीन उच्चस्तरीय जलकुंभ, जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 28 कोटी 14 लाख 98 हजार 707 रुपयांच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.



2055 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून नियोजन


शहराच्या बाह्य भागात झपाट्याने वाढणारी नागरी वस्ती आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सन 2055 पर्यंतची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणेची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात येणार आहे. केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या UCF योजनेंतर्गत महाराष्ट्रातील तीन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी केंद्राकडून 497.37 कोटी रुपयांचा सहाय्य निधी उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचाही समावेश आहे.



मुकणे धरणाच्या पाणीपुरवठा योजनेलाही चालना


या व्यापक प्रकल्पामध्ये मुकणे धरण योजनेतील विल्होळी येथील 274 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासह शहरातील विविध भागांत पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित सहा जलकुंभांची प्रत्येकी 20 लाख लिटर क्षमता असणार असून, त्यांची स्टेजिंग हाइट 20 मीटर राहणार आहे. सातपूर, नवीन नाशिक, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिकरोड आणि नाशिक पश्चिम या विभागांतील विविध भागांमध्ये ही कामे केली जाणार आहेत.



कुठे होणार नवीन जलकुंभ?


- सातपूर – पिंपळगाव बहुला शिवार: 20 लाख लिटर जलकुंभ आणि जलवाहिन्या


- नवीन नाशिक – पाथर्डी शिवार: 20 लाख लिटर जलकुंभ आणि जलवाहिन्या


- पंचवटी – हिरावाडी, शक्तीनगर: 20 लाख लिटर जलकुंभ आणि वितरण पाइपलाइन


- नाशिक पूर्व – नाशिक शिवार: 20 लाख लिटर जलकुंभ आणि वितरण वाहिन्या


- नाशिकरोड – देवळाली शिवार, दुर्गा उद्यान: 20 लाख लिटर जलकुंभ आणि जलवाहिन्या


- नाशिक पश्चिम – महात्मा नगर: 20 लाख लिटर जलकुंभ


- सातपूरमधील अतिरिक्त काम – सुला चौक ते आशीर्वाद नगर: ESR साठी फीडिंग पाइपलाइन


वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील पाण्याची गरजही वाढत असल्याने या पायाभूत सुविधांमुळे भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक सक्षम करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

Comments
Add Comment

Warren Buffett : सहा दशकांचं नेतृत्व संपलं! 'वॉरेन बफे' अध्यक्षपदावरून पायउतार; बर्कशायर हॅथवेची सूत्रं आता मुलाकडे सुपूर्द

Warren Buffett : जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नेतृत्व केलेल्या बर्कशायर हॅथवेच्या

Thane News : ठाण्यात भीषण दुर्घटना! ५ झोपड्यांना आग लागून सिलिंडरचा स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

ठाण्यातील कळवा (पश्चिम) भागात शुक्रवारी सकाळी आगीची एक मोठी दुर्घटना घडली. खारेगाव पुलाजवळ आणि सहयोग

Spy Thriller Series : एक कम्प्युटर कोड अन् देशाला धोका! ‘धुरंधर’नंतर ओटीटीवरील ही एमी विजेती सीरिज तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवेल

मुंबई : धुरंधरमधला थरार, गुप्त मिशन्स आणि शत्रूविरोधात खेळले जाणारे बौद्धिक खेळ आवडले असतील, तर ओटीटीवरील

Gondhal Movie: लग्नाची रात्र, गूढ रहस्य अन् जुनं वैर! Oscar 2027 च्या शर्यतीत गेलेल्या ‘गोंधळ’च्या कथेत नेमकं काय?

मुंबई: ९९ व्या अकादमी पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ऑस्कर २०२७ मध्ये 'गोंधळ' या मराठी चित्रपटाला

Dashmi Marathi Movie : रुपेरी पडद्यावर पुन्हा उमलणार बाप-लेकीचं भावनिक नातं! मकरंद अनासपुरे-गौरी इंगवलेचा 'दशमी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘दे धक्का 2’मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर! मुंबई : बाप-लेकीचं नातं, मुलीच्या स्वप्नांसाठी वडिलांची

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि