नवी दिल्ली : माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेलेला ३१ वर्षीय एचआर व्यावसायिक युवराज सिंग मनचंदा बेपत्ता झाल्यानंतर त्याची कथित हत्या झाल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात युवराजची माजी सहकारी अन्या वत्स आणि तिचा साथीदार संयम सचदेवा यांना उत्तराखंडमधून अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार, आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. (Delhi Crime News)
लग्नाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडला
पोलिसांच्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी युवराज आपल्या बहिणीसोबत दिल्लीतील लाजपत नगर येथील सेंट्रल मार्केटमध्ये लग्नाच्या खरेदीसाठी गेला होता. त्यानंतर गुरुग्राममध्ये एक मीटिंग असल्याचे सांगून तो तेथून निघाला. रात्री १० वाजेपर्यंत घरी परतण्याचे त्याने बहिणीला सांगितले होते. मात्र, तो घरी परतलाच नाही आणि त्याचा फोनही बंद झाला. (Delhi Crime News)
Mumbai Cyber Crime : मुंबईतील मालाड परिसरात सायबर भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 14 दिवस घराबाहेर न पडण्यास भाग पाडल्याचा ...
पाच दिवसांनंतर पोलिसांत तक्रार
युवराजचा शोध घेऊनही पाच दिवस त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान युवराजच्या फोनच्या कॉल डिटेल रेकॉर्डमधून (CDR) त्याचा त्याची पूर्वीची ऑफिस सहकारी अन्या वत्स हिच्याशी संपर्क झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी अन्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाची दिशा अन्याकडे वळली. (Delhi Crime News)
वादानंतर गोळीबार केल्याचा आरोप
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, युवराजची अन्या आणि संयम यांच्यासोबत भेट झाली होती. यावेळी आर्थिक वादातून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर युवराजच्या मानेवर दोन गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.
हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह तब्बल सात तास क्रेटा कारमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर सेक्टर ७० परिसरातील एका गटारात मृतदेह टाकून दोघेही उत्तराखंडला पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Delhi Crime News)
Warren Buffett : जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नेतृत्व केलेल्या बर्कशायर हॅथवेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता सोडली आहे. ...
उत्तराखंडमधून दोघांना अटक
तपासादरम्यान पोलिसांनी अन्या वत्स आणि संयम सचदेवा यांना उत्तराखंडमधून अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनी युवराजच्या हत्येत सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणामागील नेमका आर्थिक वाद आणि हत्येचे इतर संभाव्य कारण याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Delhi Crime News)






