Warren Buffett : जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नेतृत्व केलेल्या बर्कशायर हॅथवेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता सोडली आहे. कंपनीने १८ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली. ९६ वर्षीय बफे यांना यापुढे ‘Chairman Emeritus’ अर्थात मानद अध्यक्षाची भूमिका देण्यात आली असून, ते संचालक मंडळावर कायम राहणार आहेत. दरम्यान, दीर्घकाळापासून आखलेल्या उत्तराधिकारी नियोजनानुसार त्यांचे पुत्र हॉवर्ड जी. बफे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. (Warren Buffett)
Pakistan Mosque Blast : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारच्या नमाजावेळी भीषण स्फोट झाला. जुन्या पोलीस लाइन्सजवळील मशिदीजवळ ...
बफे यांची नवी भूमिका काय?
Chairman Emeritus म्हणून बफे कंपनीच्या बोर्डावर कायम राहतील आणि त्यांच्या अनुभवाचा, निर्णयक्षमतेचा व दृष्टिकोनाचा बर्कशायरला यापुढेही लाभ मिळणार आहे. कंपनीच्या दीर्घकालीन उत्तराधिकारी नियोजनानुसार हा बदल करण्यात आला आहे. सुसान डेकर प्रमुख स्वतंत्र संचालक (Lead Independent Director) म्हणून आपल्या भूमिकेत कायम राहतील. (Warren Buffett)
हॉवर्ड बफे यांच्याकडे अध्यक्षपद
वॉरेन बफे यांचे ७१ वर्षीय पुत्र हॉवर्ड बफे १९९३ पासून बर्कशायर हॅथवेच्या संचालक मंडळावर आहेत. दीर्घकाळापासून आखलेल्या उत्तराधिकार योजना (succession plan) नुसार आता त्यांच्याकडे बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र कंपनीचे दैनंदिन कामकाज CEO ग्रेग एबल यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहणार आहे. (Warren Buffett)
London : लंडनमधील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘द शार्ड’ (The Shard) च्या बाहेर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते एकत्र आले ...
ग्रेग एबल यांनी बफे यांच्या योगदानाचं केलं कौतुक
बर्कशायर हॅथवेचे CEO ग्रेग एबल यांनी बफे यांच्या योगदानाचे कौतुक करताना, त्यांनी उभारलेली कंपनीची संस्कृती आणि मूल्ये यापुढेही बर्कशायरच्या केंद्रस्थानी राहतील, असं म्हटलं. हॉवर्ड बफे या मूल्यांचं जतन करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Warren Buffett)
१९६५ मध्ये घेतली होती बर्कशायरची सूत्रं
वॉरेन बफे यांनी १९६५ मध्ये बर्कशायर हॅथवेची सूत्रं हाती घेतली, तेव्हा कंपनी प्रामुख्याने संघर्ष करणारी वस्त्रोद्योग कंपनी होती. पुढील सहा दशकांत त्यांच्या नेतृत्वाखाली तिचं रूपांतर विमा, ऊर्जा, रेल्वे, उत्पादन, सेवा आणि किरकोळ व्यवसाय असलेल्या १ ट्रिलियन डॉलरहून अधिक मूल्याच्या मोठ्या उद्योगसमूहात झालं. (Warren Buffett)
फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शुक्रवारी (18 सप्टेंबर) एका शाळेत झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे. दक्षिण कोटाबाटो प्रांतातील बंगा नॅशनल हायस्कूलमध्ये ...
CEO पदही आधीच सोडलं
अध्यक्षपद सोडण्यापूर्वीच बफे यांनी बर्कशायरच्या CEO पदाची जबाबदारी ग्रेग एबल यांच्याकडे सोपवली होती. आता अध्यक्षपदाची जबाबदारीही हॉवर्ड बफे यांच्याकडे गेल्याने कंपनीच्या दीर्घकाळ नियोजित नेतृत्व हस्तांतरणाचा (leadership transition)आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
बफे यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रातही कंपनीच्या भवितव्याबद्दल विश्वास व्यक्त केला असून, ते भागधारक म्हणून बर्कशायरसोबत कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. (Warren Buffett)



