न्यूझीलंडच्या 11व्या क्रमांकाच्या खेळाडूसोबत गुरनूर ब्रारचा राडा! बाद करण्यासाठी अशी क्लुप्ती वापरली Video
भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला 185 धावांवर रोखलं.यात न्यूझीलंडच्या शेवटच्या विकेटने 39 धावांची भागीदारी केली. यावेळी गुरनूर ब्रारचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.
November 4, 2026 07:21 PM
न्यूझीलंडच्या 11व्या क्रमांकाच्या खेळाडूसोबत गुरनूर ब्रारचा राडा! बाद करण्यासाठी अशी क्लुप्ती वापरली Video (Photo: BCCI Twitter)
भारताने न्यूझीलंडला पहिल्या वनडे सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 185 धावांचं आव्हान दिलं होतं. खरं तर हे आव्हान आणखी कमी होऊ शकलं असतं. कारण न्यूझीलंडच्या 146 धावांवर 9 विकेट पडल्या होत्या. पण शेवटच्या विकेटने भारतीय गोलंदाजांना त्रास दिला. 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ब्लेयर टिकनेरने भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी चांगलंच झुंजवलं. जेकब डफी आणि ब्लेयर टिकनेर या जोडीने 31 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. यात ब्लेयर टिकनेरने 23 चेंडूत 34 धावांची खेळी केली. यात त्याने एक चौकार आणि 4 षटकार मारले. या जोडीमुळे अर्शदीप सिंगचा शेवटच्या षटकात पूर्ण ग्राफ बिघडला. टिकनरने अर्शदीपच्या शेवटच्या षटकात तीन षटकार मारले आणि 23 धावा काढल्या. पण जेव्हा गुरनूर ब्रार गोलंदाजीला आला तेव्हा त्याने ब्लेयरला डिवचलं आणि रणनिती कामी आली.
41 व्या षटकात गुरनूर आणि टिकनेर भिडले!
गुरनूर ब्रार आणि ब्लेयर टिकनेर यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचं पाहायला मिळालं. 41 व्या षटकात हे चित्र पाहायला मिळालं. ब्लेयर टिकनेर फॉर्मात होता आणि चेंडू पट्ट्यात घेऊन मारत होता. त्यामुळे गुरनूर ब्रारला तसंच करेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. 41व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा नादात ब्लेयर टिकनेर चुकला. हा चेंडू थेट विकेटकीपर केएल राहुलच्या हातात गेला. त्यानंतर गुरनूर ब्रारने त्याला डिवचलं. गुरनूर ब्रारने त्याला काही तरी सांगितलं आणि कसा फटका मारायचा हे इशाऱ्यातून सांगितलं. मग काय जेव्हा असं काही घडतं तेव्हा प्रत्युत्तर येतं. टिकनेरने तसंच करण्याचा प्रयत्न केला आणि फसला. पुढच्याच चेंडूवर गुरनूरने त्याची विकेट काढली.
Banter hits different with a wicket to show for it! 😂
Watch the HERO VIDA India Tour of New Zealand 1st ODI, LIVE NOW on Sony Sports Network TV channels, Sony LIV & Sony Vizha.
#SonySportsNetwork #SonyLIV #SonyVizha #NZvIND https://t.co/G0i2RBAN8Y
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 4, 2026
[caption id="attachment_1072203" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत ...
काय म्हणाला कर्णधार मिचेल सँटनर?
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, मला वाटतं खेळपट्टी कदाचित उसळत होती आणि ईडन पार्कवर ती आमच्या अपेक्षेपेक्षा थोडी जास्त वेगवान होती. मला वाटतं की आम्ही जितक्या लवकर जुळवून घेऊ शकलो असतो, तितक्या लवकर जुळवून घेऊ शकलो नाही. आणि त्यात भारताची चांगली गोलंदाजीही होती. मला वाटतं की जेव्हा तुम्ही ईडन पार्कच्या उसळीशी झुंज देण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ते खूप कठीण असू शकतं. मला वाटतं की त्यांनी ज्या प्रकारे त्याचा थोडा जास्त वापर केला आणि श्रेयस शॉर्ट बॉल्स टाकून अधिक अचूक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. अर्थातच चेंडू खूप उसळत होता आणि पावसानंतर तो छान घसरत होता. त्यामुळे काही शॉर्ट बॉल्स टाकले गेले.