Gondhal Movie: लग्नाची रात्र, गूढ रहस्य अन् जुनं वैर! Oscar 2027 च्या शर्यतीत गेलेल्या ‘गोंधळ’च्या कथेत नेमकं काय?

मुंबई: ९९ व्या अकादमी पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ऑस्कर २०२७ मध्ये 'गोंधळ' या मराठी चित्रपटाला भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) कडून शुक्रवारी घोषणा करण्यात आली. 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटगरीसाठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र बोलबाला असलेल्या 'गोंधळ' चित्रपटाचं नेमकं कथानक काय? कोणत्या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट आहे? जाणून घेऊया...

संजय डावखर दिग्दर्शित, 'गोंधळ' चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ऑस्कर २०२७ साठी ३३ चित्रपटांच्या यादीतून 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा एकदा ऑस्कर २०२७ च्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीचं नाव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचलं आहे. 'गोंधळ' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर महाराष्ट्राची लोककला सादर करण्याचा प्रयत्न संजय डावखर यांनी केला आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाचे सर्वच स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. अगदी सामान्य असलेल्या चित्रपटाच्या कथानकाने फक्त मराठी माणसाच्याच नाही तर जगभरातल्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.



महाराष्ट्रामध्ये 'गोंधळ'ला पारंपारिक लोककला म्हणून समजले जाते. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला, श्रद्धा आणि एकाच रात्रीत घडणाऱ्या गूढ रहस्यावर चित्रपटाचे कथानक आहे. लग्नापूर्वी घातल्या जाणाऱ्या पारंपरिक 'गोंधळ' विधीच्या पार्श्वभूमीवर एका रात्रीत घडणाऱ्या नाट्यमय आणि थरारक घटनांवर ही कथा फिरते. लोककला, श्रद्धा आणि त्यामागे दडलेले रहस्य याचे प्रभावी चित्रण चित्रपटात करण्यात आलं आहे. महाराष्ट्राची पारंपारिक लोककला समजल्या जाणाऱ्या चित्रपटाची एक- दोन नाही तर, ३३ चित्रपटांतून निवड करण्यात आली आहे. एकापेक्षा एक उत्तम धाटणीच्या चित्रपटांतून गोंधळ चित्रपटाला 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीसाठी निवड करण्यात आली आहे.

'गोंधळ'चं कथानक


संतोष डावखर दिग्दर्शित, 'गोंधळ' चित्रपटामध्ये महाराष्ट्रामध्ये पवित्र समजली जाणारी 'गोंधळ'ही लोककला आणि धार्मिक विधी दाखवली आहे. महाराष्ट्रातील एका गावात, नवविवाहित दाम्पत्याचा 'गोंधळ'चा कार्यक्रम असतो. त्यांच्या संसारातील विघ्न दूर करण्यासाठी गोंधळाचं आयोजन करण्यात आलेलं असतं. गोंधळाच्या विधीला सुरूवात होते. पण गावातील पाटलांचा मुलगा त्या नव वधूच्या प्रेमामध्ये वेडा असतो, तिचं दुसऱ्या तरूणासोबत लग्न झाल्यामुळे तो दु:खी होतो. गोंधळाच्याच रात्र कशापद्धतीने जुनं वैर, अनेक माहित नसलेली रहस्य आणि गुपिते कशा पद्धतीने समोर येतात? हे आपल्याला चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. 'गोंधळ' चित्रपटातून महाराष्ट्राच्या लोककलेचं दर्शन घडणार आहे.



‘बालन’, ‘बायसन’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर’, ‘धुरंधर: द रिव्हेंज ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळ बंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारख्या वेगवेगळ्या भाषांतील, उत्तम धाटणीच्या चित्रपटातून आणि नावाजलेले चित्रपट भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. त्यापैकी काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांची पार्श्वभूमी होती, तर ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमागे उत्तम बजेट, दमदार स्टारकास्ट आणि सर्वांकडून मिळालेली कौतुकाची थाप अशी वेगवेगळी ताकद होती. या तगड्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या लोककलेचे आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या मराठी ‘गोंधळ’ चित्रपटाची निवड झाली. यातूनच पुन्हा एकदा मराठी फिल्म इंडस्ट्रीने ऑस्करमध्ये भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करण्याचा ऐतिहासिक मान पटकवला आहे.

याआधी फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२६, इफ्फीमध्ये सिल्व्हर पिकॉक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, फिप्रेस्को पुरस्कार, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ्फ), झी चित्र गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवलेल्या ‘गोंधळ’ चित्रपटाची जादू

&pp=0gcJCSQMAYcqIYzv">९९ व्या अकादमी पुरस्कारामध्ये
पाहायला मिळणार आहे. चित्रपटाने देशासह परदेशातही दमदार ठसा उमटवत मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. ‘गोंधळ’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती डावखर फिल्म्सने केली. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Comments
Add Comment

Spy Thriller Series : एक कम्प्युटर कोड अन् देशाला धोका! ‘धुरंधर’नंतर ओटीटीवरील ही एमी विजेती सीरिज तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवेल

मुंबई : धुरंधरमधला थरार, गुप्त मिशन्स आणि शत्रूविरोधात खेळले जाणारे बौद्धिक खेळ आवडले असतील, तर ओटीटीवरील

Dashmi Marathi Movie : रुपेरी पडद्यावर पुन्हा उमलणार बाप-लेकीचं भावनिक नातं! मकरंद अनासपुरे-गौरी इंगवलेचा 'दशमी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘दे धक्का 2’मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर! मुंबई : बाप-लेकीचं नातं, मुलीच्या स्वप्नांसाठी वडिलांची

अभिमानास्पद! Oscar 2027 च्या शर्यतीत मराठी चित्रपटाची निवड

मुंबई: मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी अभिमानाची बातमी समोर येत आहे. २०२५ मध्ये रिलीज झालेला संतोष डावखर दिग्दर्शित

Diler Kharkiya : रेंज रोव्हरवर गोळीबार अन् थेट धमकी! 'दिलेर खरकिया'वरील हल्ल्याने हरियाणात खळबळ

Diler Kharkiya : हरियाणवी गायक आणि अभिनेता दिलेर खरकियाच्या रेंज रोव्हरवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. भिवानीतील

Rajpal Yadav Cheque Bounce Case : ‘कोर्टात अभिनय करू नका’....ही शेवटची संधी म्हणत सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादवांना सुनावलं

Rajpal Yadav Cheque Bounce Case : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी अद्याप कायम आहेत. चेक बाऊन्स आणि कर्जाच्या प्रकरणात

Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी... मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

[caption id="attachment_1059712" align="aligncenter" width="728"] प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र