मुंबई: मुंबईतील विक्रोळीमध्ये मेट्रोच्या कामावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रोळीतील एल.बी.एस रोडवर शुक्रवारी दुपारी मेट्रोच्या कामानिमित्त बेरिकेट्स उभारण्यात आले होते. लोखंडी बॅरिकेट्स अंगावर पडून झालेल्या अपघातामध्ये एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कामाच्या ठिकाणी होत असलेला हलगर्जीपणा अधोरेखित झाला आहे. मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणावरून दुचाकीवरून जात असताना बॅरिकेट्स अंगावर पडल्याची घटना घडली, या घटनेमध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यूच झाला आहे.
IIT Bombay student suicide news : ChatGPT चा वापर अन् दुर्दैवी अंत! IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ; नक्की काय घडलं ?
मुंबई : IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी आत्महत्येच्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालं आहे. साहिलच्या मानसिक स्थितीचा वेध घेणारी ...
शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अंगावर लोखंडी बॅरिकेट्स पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव, वसीम हैदर असून ते घाटकोपर पश्चिमेतील रहिवासी आहे. शुक्रवारी दुपारी मुलुंड परिसरामध्ये काही कामानिमित्त ते दुचाकीवरून चालले होते. त्यांच्या बाईकचा MH 03 CY 0751 असा नंबर होता. मुलुंडला जात असताना एल.बी.एस. रोडवरील रोझरी बॉयोटेक इमारतीसमोर अचानक त्यांच्या अंगावर रस्त्यालगत उभारलेला एक लोखंडी बॅरिकेट पडला. या अपघातात वसीम हैदर गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर लगेचच त्यांना घाटकोपरमधील राजावाडी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
IIT Mumbai : 'आयआयटी मुंबई'तील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; परीक्षेतील ChatGPT प्रकरण केंद्रस्थानी
मुंबई : आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याचा १८ सप्टेंबर २०२६ रोजी वसतिगृहात ...
हैदर यांच्या मुलाने मेट्रोचे काम करणारी कंत्राटदार कंपनी, सुपरवायझर आणि व्यवस्थापक आदींविरोधात पार्कसाईट पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. मुंबईत मेट्रोच्या बांधकामादरम्यान वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे. यापूर्वी, मुलुंडमध्ये एल. बी. एस. रोडवर १४ फेब्रुवारी रोजी मेट्रोचा पॅरापेट स्लॅब कोसळून ब्रिजच्या खालून जाणाऱ्या एका रिक्षावर आणि कारवर कोसळल्याची घटना घडली होती. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले. तर १२ सप्टेंबर रोजी वडाळ्यातील भक्ती पार्क मेट्रो स्थानकाच्या बांधकामादरम्यान लोखंडी मचाण कोसळून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.