Saturday, September 19, 2026

Golmaal 5 Release Date: ‘गोलमाल 5’ कधी रिलीज होणार? रोहित शेट्टीने केली मोठी घोषणा

Golmaal 5 Release Date: ‘गोलमाल 5’ कधी रिलीज होणार? रोहित शेट्टीने केली मोठी घोषणा

Golmaal 5 Release Date: ‘गोलमाल’ फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी अखेर मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘गोलमाल 5’च्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टीची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘गोलमाल 5’ कधी येणार ?

‘गोलमाल’ फ्रँचायझीचे आतापर्यंत चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, प्रत्येक भागाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पाचव्या भागाची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी शनिवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘गोलमाल 5’चे पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली. चित्रपट 8 जानेवारी 2027 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पोस्टरमध्ये दिसली जुनीच धमाल

रिलीज डेट जाहीर करताना शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये अजय देवगण बाईकवर दिसत आहेत. त्यांच्यासोबत अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर आणि कुणाल खेमू हे देखील मजेशीर अंदाजात दिसत आहेत. रोहित शेट्टी यांनी पोस्टसोबत, “हास्य-मस्ती, आनंद आणि कुटुंब… बस, आणखी काही नाही. 8 जानेवारी 2027.” असे कॅप्शन लिहिले आहे.

अजय देवगण-रोहित शेट्टी पुन्हा एकत्र

‘गोलमाल’ फ्रँचायझीच्या यशामध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडीचा मोठा वाटा आहे. आता दोघेही पाचव्या भागासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणसोबत अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू, शर्मन जोशी आणि तुषार कपूर हे कलाकारही चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

यावेळीही मिळणार कॉमेडीचा फुल डोस?

‘गोलमाल’च्या चित्रपटांची ओळख म्हणजे भन्नाट कॉमेडी, मजेदार गैरसमज आणि एका पाठोपाठ घडणाऱ्या गोंधळलेल्या घटना. पाचव्या भागातही प्रेक्षकांना याच धाटणीची धमाल पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. आता 8 जानेवारी 2027 रोजी ‘गोलमाल 5’ थिएटरमध्ये दाखल होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >