मुंबई : जन्म आणि मृत्यू हे मानवी जीवनातील अटळ सत्य मानले जाते. भारतीय संस्कृतीत मात्र मृत्यूला जीवनाचा शेवट न मानता जन्म-मृत्यूच्या चक्रातील एक टप्पा मानले जाते. याच संकल्पनेभोवती कर्म, नियती, पुनर्जन्म आणि मानवी अस्तित्वाचं गूढ उलगडणारा ‘मृत्यूचक्र’ हा मराठी भयपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भय, रहस्य आणि भावनिकतेचा संगम असलेला हा सिनेमा २३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतंच सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, त्यातील गूढ आणि भयावह दृश्यरचनेमुळे सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. (Mrutyuchakra Marathi Movie)
महाराष्ट्राच्या मातीतील ‘गोंधळ’ची ऑस्करवारी चांगलीच गाजतेय! मुंबई : महाराष्ट्राची परंपरा, मानवी नात्यांतील गुंतागुंत आणि थरार यांचा अनोखा संगम ...
पोस्टरमधून गूढ कथानकाची झलक
‘मृत्यूचक्र’च्या पोस्टरमध्ये मध्यभागी एक भव्य प्राचीन चक्र दाखवण्यात आलं आहे. या चक्राच्या मध्यभागी लाल रंगाचा चंद्र किंवा ग्रहासारखी आकृती दिसते. चक्राच्या भोवती अनेक व्यक्तिरेखांचे चेहरे दाखवण्यात आले असून, प्रत्येक पात्रामागे एखादं गूढ रहस्य दडलेलं असल्याची झलक पोस्टरमधून मिळते.
पोस्टरच्या पार्श्वभूमीवर जुनं मंदिर किंवा वाड्यासारखी वास्तू, अंधारलेलं वातावरण आणि एका बाजूला दिसणारा हॉस्पिटलचा प्रसंग लक्ष वेधून घेतो. ‘प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…’ ही ओळ या पोस्टरवर असून, मृत्यूमागील गूढ शक्ती नेमकी काय आहे, हॉस्पिटल आणि जुन्या वास्तूचा संबंध काय आहे आणि या सर्व घटनांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. (Mrutyuchakra Marathi Movie)
आधुनिक विज्ञान विरुद्ध अदृश्य शक्ती?
सिनेमाच्या पोस्टरवरून कथानकात आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक श्रद्धा किंवा अदृश्य शक्ती यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमी असण्याची शक्यता दिसून येते. मात्र, या गूढ घटनांमागचं नेमकं सत्य काय आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
‘मृत्यूचक्र’ केवळ भयपटाच्या चौकटीत मर्यादित न राहता कर्म, नियती, पुनर्जन्म आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती अर्थात मोक्ष या गंभीर विषयांना स्पर्श करणार असल्याचं चित्रपटाच्या संकल्पनेवरून दिसून येतं. त्यामुळे भय आणि रहस्यासोबतच मानवी अस्तित्वाविषयी काही प्रश्नही या सिनेमातून मांडले जाणार आहेत. (Mrutyuchakra Marathi Movie)
मुंबई: 'रश्मी रॉकेट' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती क्षिती जोग हिने काम केलं आहे. मराठी ...
दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा कोणाच्या हाती?
श्री महादेव फिल्म प्रॉडक्शन आणि अध्यांश मोशन पिक्चर यांच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. उन्मेश वाघमोडे निर्माते असून प्रणाली विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू गंगावणे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. (Mrutyuchakra Marathi Movie)
सिनेमाची कथा डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारी विलास वाघमोडे आणि डॉ. सुधीर निकम यांनी सांभाळली आहे. रोहन शहा हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ‘मृत्यूचक्र’चं वितरण जयेश मिस्त्री यांच्या UJM Networks & Entertainment तर्फे करण्यात येणार आहे.
तांत्रिक बाजूही दमदार
चित्रपटाचं छायांकन निशांत भागवत यांनी केलं असून, राहुल भातणकर यांनी एडिटिंगची जबाबदारी सांभाळली आहे. सिनेमाला केदार दिवेकर यांचं संगीत आहे. गीते वलय मुळगुंद यांनी लिहिली असून सुहास सावंत आणि शमिका भिडे यांनी गाणी गायली आहेत. (Mrutyuchakra Marathi Movie)
‘दे धक्का 2’मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर! मुंबई : बाप-लेकीचं नातं, मुलीच्या स्वप्नांसाठी वडिलांची धडपड आणि त्या नात्यातील भावनिक ...
मातब्बर कलाकारांची फौज
‘मृत्यूचक्र’मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक परिचित आणि अनुभवी कलाकार पाहायला मिळणार आहेत. शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले, संजय शेजवळ, शलाका गाडे, शरा गायकवाड, जितेंद्र पोळ आणि अनिल रबाळे यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. (Mrutyuchakra Marathi Movie)
विशेषतः शशांक शेंडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांसारख्या ताकदीच्या कलाकारांच्या सहभागामुळे चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि कथानकातील नाट्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.



