KBC 18 : ‘कौन बनेगा करोडपती’ हा केवळ प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसाची रक्कम जिंकण्याचा शो नाही, तर अनेकदा या मंचावर स्पर्धक आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि भावनिक आठवणीही शेअर करतात. KBC 18 च्या एका भागात छत्तीसगडमधील बिलासपूर येथील कपिला तनेजा यांनी सांगितलेली कहाणी ऐकून अमिताभ बच्चनही भावुक झाले.
हुंड्यासाठी छळ केल्याचा दावा
अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसलेल्या कपिला तनेजा यांनी त्यांच्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगाबद्दल सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी त्यांचा छळ करण्यात आला. कपिला यांनी सांगितले की, त्यांचे लग्न कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध झाले होते. त्यामुळे सासरच्या मंडळींमध्ये नाराजी होती आणि माहेरकडून हुंड्याची अपेक्षा केली जात होती. लग्नानंतर परिस्थिती अधिकच बिघडल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई : जन्म आणि मृत्यू हे मानवी जीवनातील अटळ सत्य मानले जाते. भारतीय संस्कृतीत मात्र मृत्यूला जीवनाचा शेवट न मानता जन्म-मृत्यूच्या चक्रातील एक टप्पा ...
‘रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला’
कपिला यांच्या कथनानुसार, 2002 मध्ये त्यांच्यावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या वेळी त्या गंभीररित्या भाजल्या आणि दोन आठवड्यांहून अधिक काळ बेशुद्ध होत्या. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्या उपचारांसोबतच शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कपिला यांनी या प्रसंगाचे वर्णन करताना सांगितले की, सासरच्या मंडळींकडून आधी त्रास देण्यात आला आणि त्यानंतर त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या अंगावरील साडीला आग लागल्यानंतर त्यांनी कसाबसा स्वतःला पाण्याच्या टाकीजवळ नेल्याचेही त्यांनी सांगितले.
‘24 वर्षांपासून मुलीला पाहिलेलं नाही’
या संपूर्ण प्रसंगात कपिला यांना सर्वाधिक भावुक करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलीपासून झालेला दुरावा. कपिला यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर गेल्या 24 वर्षांपासून त्यांनी आपल्या मुलीला पाहिलेले नाही आणि तिची भेटही झालेली नाही. आपल्या आयुष्यातील हा प्रसंग सांगताना कपिला भावुक झाल्या. त्यांची कहाणी ऐकताना अमिताभ बच्चन यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
अमिताभ बच्चनही झाले भावुक
कपिला यांची कहाणी ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वेदनेबद्दल संवेदना व्यक्त केल्या. महिलेच्या आयुष्यात अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले. KBC 18 मधील या प्रसंगाने कार्यक्रमातील उपस्थितांनाही भावुक केले. कपिला तनेजा यांनी आपल्या आयुष्यातील कठीण काळाची सांगितलेली कहाणी आता चर्चेत आली आहे.