Saturday, September 19, 2026

Mumbai Traffic: सिद्धिविनायकाच्या जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, मंदिर परिसरात वाहतुकीचे निर्बंध

Mumbai Traffic: सिद्धिविनायकाच्या जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, मंदिर परिसरात वाहतुकीचे निर्बंध
मुंबई: मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये २९ सप्टेंबरला वाहतूक पोलि‍सांकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. येत्या २९ सप्टेंबरला अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थिती लावत असतात. हिच भाविकांची गर्दी लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनी मंदिर परिसरामध्ये वाहतूकीसंबंधित निर्बंध लावले आहेत. यामुळे भाविकांना मंदिराच्या परिसरामध्ये येताना समस्यांना तोंड द्यावी लागण्याची शक्यता आहे.
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी गरज भासल्यास परिसरामध्ये वाहतूकीचे निर्बंध आणखीन वाढवले ​​जाण्याची शक्यता असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या पोलीस उपआयुक्त (मुख्यालय आणि मध्य) डॉ. दिपाली धाटे यांनी माहिती दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर रोड, एस.के. बोले रोड, गोखले रोड (दक्षिण आणि उत्तर), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सायेणी रोड, आप्पासाहेब मराठे मार्ग या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते.
गोखले रोडकडून एस. के. बोले रोडवर जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. गोखले रोडवरून दत्ता राऊल रोड आणि एन. एम. काळे रोडवर जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. आगर बाजार जंक्शनपासून एस. के. बोले रोडवर जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरापासून एस. के. बोले रोड, आगर बाजार आणि पोर्तुगीज चर्चच्या दिशेने जाणारा एस. व्ही. एस. रोड अंगारकी चतुर्थीच्या दिवशी वाहतूकीसाठी बंद राहील. सायेणी रोडवरील लेनिनग्राड चौकातून शंकर घाणेकर मार्गाकडे जाणारे उजवे वळण आणि रविंद्र नाट्य मंदिरकडून डावे वळण वाहतूकीसाठी बंद राहील. स्थानिक रहिवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासासाठी मुभा दिली गेली आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >