Nashik Road Jail Gangwar : नाशिकरोड कारागृहात 10 ते 12 कैद्यांचा न्यायाधीन बंदीवर हल्ला, भाईगिरीला आळा कधी ?

Nashik Road Jail Gangwar : सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Central Jail) कैद्यांमधील मारामारीचे सत्र पुन्हा समोर आले आहे. 15 सप्टेंबर रोजी कारागृहातील सर्कल क्रमांक 7, बॅरेक क्रमांक 3 मध्ये एका न्यायाधीन कैद्यावर 10 ते 12 कैद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली.



बॅरेकमध्ये अचानक हल्ला


पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, न्यायाधीन बंदी नितीन उर्फ सुनील हिरामण शिंदे (वय 34) याच्यावर संशयित कैद्यांनी बेकायदेशीरपणे जमाव करून हल्ला केला. अजय रायकर, जतिन बच्छाव, उमेश पाटील, संतोष दळवी, रोहित पवार, गौरव गोसावी, सुजल जाधव, देव वाघमारे, इम्रान सैय्यद यांच्यासह अन्य कैद्यांनी नितीन शिंदे याला खाली पाडून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी शिवीगाळ करत धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल


पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगलसदृश कृत्य, धमकी देणे तसेच शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे यांसारख्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणातील आरोपी कैद्यांवर कारागृह प्रशासन आणि पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.



कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह


नाशिकरोड कारागृहात यापूर्वीही कैद्यांकडून कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच कारागृहात मोबाईल, अमली पदार्थ किंवा धारदार वस्तू सापडल्याच्या घटनांमुळे सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारागृहाच्या कामकाजाबाबत विविध स्तरांवरून पाहणी आणि निरीक्षणे होत असतानाही कैद्यांमध्ये अशा प्रकारे मारामारी होत असल्याने कारागृहातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या नियंत्रणावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


या घटनेमागील नेमके कारण काय होते, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व कैद्यांवर कोणती कारवाई होणार आणि कारागृह प्रशासनाकडून सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली जाणार, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : "आम्ही पण मुंबईकर"! परळच्या चिटणीस कुटुंबाचा देखावा; समुद्री जीवांच्या संरक्षणासाठी गणेशोत्सवातून हाक

मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या उंचच उंच इमारती, लोकल ट्रेनची गर्दी आणि गजबजलेले रस्ते! पण याच

Ahilyanagar News : पतीच्या शिक्षिकेसोबतच्या संबंधाच्या संशयातून पत्नी थेट शाळेत, पुढे घडले असे काही की...

Ahilyanagar News : पती आणि प्राथमिक शिक्षिकेतील कथित जवळकीच्या संशयातून संतप्त झालेल्या पत्नीने थेट शाळेत जाऊन शिक्षिकेला

Jalgaon Cotton Rate : जळगावात कापसाला हंगामाच्या सुरुवातीलाच 8,500 रुपये भाव, दरवाढीची शक्यता

Jalgaon Cotton Rate : जळगाव जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामाला सुरुवात झाली असून, जिनिंग आणि बाजार समित्यांमध्ये

Chhatrapati Sambhajinagar Crime : संचालकांच्या मुलीचा फोटो DP वर ठेवला अन् अकाउंटंटकडून दीड तासात 3.70 कोटींचा व्यवहार केला ; सायबर ठगांचा नवा फंडा समोर

Chhatrapati Sambhajinagar Crime : सायबर ठगांनी फसवणुकीसाठी आता ओळखीच्या व्यक्तींच्या फोटोचाही गैरवापर सुरू केल्याचे समोर आले आहे.

IIT Bombay Student Death : परीक्षेदरम्यान चॅटजीपीटी वापरल्याचा प्रकार; विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये आंदोलन

मुंबई : मुंबईतील पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय

Disha Salian Case : सतीश सालियन मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दिशा सालियन