Yavatmal Crime News : घरासमोरची कार ठरली चिमुकल्यासाठी काळ, चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू ; नेमकं घडलं काय ?

Yavatmal Crime News : घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात घडली आहे. चिखलवर्धा येथे ही घटना घडली. खेळता खेळता कारमध्ये गेलेल्या चिमुकल्याचा दरवाजा आतून लॉक झाल्याने तो बराच वेळ कारमध्ये अडकून राहिला. मात्र त्यानंतर दरवाजा बंद झाल्यामुळे मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला.



खेळता खेळता कारमध्ये शिरला अन्...


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंश सुरज केळझरकर हा चार वर्षांचा मुलगा नेहमीप्रमाणे घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तो शेजारी उभ्या असलेल्या कारजवळ गेला. त्याने कारचा दरवाजा उघडला आणि तो आतमध्ये शिरला. मात्र, काही वेळाने कारचा दरवाजा आतून लॉक झाला. अंशला तो दरवाजा पुन्हा उघडता आला नाही. त्यामुळे तो बराच वेळ बंद कारमध्येच अडकून राहिला.



मुलगा दिसेना म्हणून कुटुंबीयांची शोधाशोध


अंश बराच वेळ घरासमोर दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्यांनी घराच्या आजूबाजूचा परिसर तसेच इतर ठिकाणी शोधाशोध केली. मात्र, शेजारी उभ्या असलेल्या कारकडे सुरुवातीला कुणाचेही लक्ष गेले नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अंश कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. बंद कारमध्ये बराच वेळ अडकल्याने त्याची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगण्यात आले.



रुग्णालयात उपचार सुरू, मात्र प्राणज्योत मालवली


कुटुंबीयांनी तातडीने अंशला कारमधून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान अंशचा मृत्यू झाला. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने केळझरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

कृषी, आरोग्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात गोदरेज इंडस्ट्रीज करणार करोडोंची गुंतवणूक, महिलांना मिळणार हाती रोजगार

मुंबई: उद्योगांच्या सामाजिक उपक्रमांचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्याच्या सर्वांगीण

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:  चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री

PAT Exam: ‘पीएटी’ परिक्षेची तारीख आली, विद्यार्थ्यांनो लागा तयारीला...

अहिल्यानगर: राज्यातील शाळांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी

पाणी टंचाईतील थकित बिले तातडीने देण्याचे निर्देश; चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

केंद्राकडून मच्छिमारांसाठी 'एनडीआरएफ'च्या मदतीत वाढ

मुंबई: नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणाची नांदी

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात एक नवे समीकरण