काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना; Video Viral

देश: बऱ्याचदा रिकामा रस्ता दिसला की, आपण अनावधानाने चालतो. पण हेच अनावधानाने चालणं केव्हा आपल्या अंगाशी येईल, याचं काही सांगता येत नाही. बऱ्याचदा साधं रस्त्यावरून चालताना, रस्त्यावर फक्त उभं राहिलं तरी, दुचाकीवर बसलं तरी आपण पटकन मोबाईल काढून सोशल मिडिया स्क्रोल करतो. पण हेच सहज रस्त्यावर उभं राहून सोशल मिडिया स्क्रोलिंग करत बसणं एका तरूणीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. पण तिच्या सावधानतेमुळे तिचा जीव थोडक्यात बचावला आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.



सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर थायलंडमधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरूणी रस्त्याच्या कडेला दुचाकीवर मोबाईलवर सोशल मिडिया स्क्रोल करत बसलेली होती. पण सावधानतेमुळे तिचा जीव वाचला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, पिकअप ड्रायव्हरचे त्याच्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या दुचाकीच्या दिशेने गेली. पण नशीब बलवत्तर म्हणून, त्या दुचाकीवर बसलेल्या तरूणीचा थोडक्यात वाचला आहे. ती तरूणी पटकन बाजूला सरकल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. पिकअप ड्रायव्हरचा तोल गेल्यामुळे रस्त्यावरच पिकअप पडली आणि नंतर ती पिकअप पुढे आली. त्या तरूणीच्या सावधानतेमुळे तिचा जीव वाचला आहे.

 



सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनेच्या वेळी रस्त्यावर इतरत्र वाहने किंवा व्यक्ती नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेवेळी रस्त्यावर वाहनं किंवा फुटपाथवरून जाणारी लोकं असती तर मोठी दुर्घटना घडली असती. थायलंडमधील नेमक्या कोणत्या शहरातली ही घटना आहे, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्या तरूणीच्या सावधानतेचं कौतुक करीत आहेत. व्हायरल व्हिडिओला काही तासांतच हजारो व्ह्यूज मिळाले असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. रस्त्यावरून चालताना कायमच सावधानता बाळगूनच रस्त्यावरून चालायला हवं. आपली एक चूक केव्हा आपल्या अंगाशी येईल, याचं काही सांगू शकत नाही. त्यामुळे कायमच चालताना सुद्धा आणि वाहने चालवतानाही नियमांचे काटेकोर पालन करायला हवे.

Comments
Add Comment

Medical store CCTV : प्रत्येक मेडिकल स्टोअरवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर! सरकारचा नवा प्रस्ताव; पण औषध विक्रेत्यांचा विरोध का?

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा मोठा प्रस्ताव समोर

UPI transaction charges news : ₹२,००० पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क; मुंबईतील व्यापारी चिंतेत, ग्राहकांमध्ये नाराजी

मुंबई : युपीआय (UPI) पेमेंट प्रणालीबाबत समोर आलेल्या एका नव्या प्रस्तावामुळे मुंबईतील व्यापारी आणि सर्वसामान्य

BCCI AGM : BCCIच्या वार्षिक बैठकीत IPL, बजेट अन् शताब्दी सोहळ्याबाबत मोठे निर्णय; जाणून घ्या १० महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) शुक्रवारी, १८ सप्टेंबर २०२६ रोजी

Crime News : फ्रीजमध्ये ५ वर्षांच्या लेकीचा मृतदेह, वडिलांची आत्महत्या; खोलीत फुगे, मेणबत्त्या अन् ३ सुसाइड नोट्स... नेमकं प्रकरण काय?

अमरेली : गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे एका वडिलांनी आपल्या ५ वर्षीय मुलीची हत्या

Surinder koli suicide : २००६ च्या बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरिंदर कोळीची आत्महत्या; हरिद्वारमधील चहाच्या टपरीवर गळफास

हरिद्वार : २००६ मधील नोएडा येथील बहुचर्चित आणि थरारक निठारी नरसंहार प्रकरणातील मुख्य आरोपी सुरिंदर कोळी याने

Amazon India : इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढल्याने ग्राहकांची खरेदी मंदावली; सणासुदीपूर्वी 'ॲमेझॉन इंडिया'च्या विक्रीला फटका

मुंबई : सणासुदीच्या खरेदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच भारतीय इलेक्ट्रॉनिक्स बाजारावर वाढत्या किमतींचा परिणाम