अमरावती : बडनेऱ्याजवळील दाभा परिसरात बंद घरातून ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वैशाली असे मृत महिलेचे नाव असून, ती गेल्या चार वर्षांपासून ललित नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि या घटनेमागील परिस्थितीचा तपास बडनेरा पोलीस करत आहेत. (Amravati Crime News)
घरातून दुर्गंधी आल्याने प्रकार उघडकीस
सकाळच्या सुमारास घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. सुरुवातीला हा नेहमीचा वास असावा, असा अंदाज काही जणांनी व्यक्त केला. मात्र घराला कुलूप असल्याने आणि दुर्गंधी वाढत असल्याने गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने बडनेरा पोलिसांना माहिती दिली.
पुणे : पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल ( Ketan Agarwal) याच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण ...
पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर वैशालीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. (Amravati Crime News)
चार वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, वैशाली ललितसोबत मागील चार वर्षांपासून या घरात राहत होती. दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती शेजारी आणि स्थानिकांकडून पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या वादांचा वैशालीच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. (Amravati Crime News)
डोक्याला गंभीर दुखापत
वैशालीच्या शरीरावर दुखापतीच्या खुणा आढळल्या असून, तिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात ‘मल्टिपल इंज्युरी’ मुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र या दुखापती नेमक्या कशामुळे झाल्या, याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास आणि पुढील वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. (Amravati Crime News)
सोलापूर : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून २६ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात ...
ललित बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू
घटना उघडकीस आल्यानंतर वैशालीसोबत राहणारा ललित परिसरातून गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर केंद्रित झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
वैशालीच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे, तिच्यावर हल्ला झाला होता का आणि या घटनेत ललितचा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत. ललित सापडल्यानंतरच या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. (Amravati Crime News)