नवी दिल्ली : सोमवारपासून (२१ सप्टेंबर) सुरू होणारा आगामी कारोबारी आठवडा प्राथमिक बाजारपेठेसाठी (Primary Market) अत्यंत उत्साहाचा आणि गजबजलेला असणार आहे. नव्या आठवड्यात तब्बल १८ कंपन्या आपले पब्लिक इश्यू (IPO) गुंतवणुकीसाठी लाँच करणार आहेत. यामध्ये ६ मेनबोर्ड सेगमेंटमधील तर १२ एसएमई (SME) सेगमेंटमधील कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय, यापूर्वी खुले झालेल्या ५ आयपीओमध्येही गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे.(IPO Update 2026)
दुसरीकडे, या आठवड्यात १४ वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंगच्या माध्यमातून पदार्पण करणार आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या घडामोडींवर असणार आहे.
नव्या आठवड्यात लाँच होणारे प्रमुख आयपीओ:
-
२१ सप्टेंबर:
-
विवेकानंद कोट्सपिन: २२.२० कोटी रुपयांचा हा इश्यू २३ सप्टेंबरपर्यंत खुला राहील. प्राइस बँड ३२ ते ३७ रुपये, तर लॉट साइज ३,००० शेअर्सचा आहे. (लिस्टिंग: २८ सप्टेंबर, बीएसई एसएमई)
-
एफएक्स मल्टीटेक: ४५.२४ कोटी रुपयांच्या या इश्यूचा प्राइस बँड ११० ते ११६ रुपये आणि लॉट साइज १,२०० शेअर्स आहे. (लिस्टिंग: २८ सप्टेंबर, बीएसई एसएमई)
-
रोबोकिड्स एडुवेंचर्स: ३१.०९ कोटी रुपयांच्या इश्यूसाठी १०० ते १०६ रुपये प्राइस बँड आणि १,२०० शेअर्सचा लॉट आहे. (लिस्टिंग: २८ सप्टेंबर, बीएसई एसएमई)
-
मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर रविवारी, २० सप्टेंबर रोजी पहाटे भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी ...
-
२२ सप्टेंबर:
-
वर्मोरो ग्रॅनिटो: ७०८.०२ कोटी रुपयांचा मोठा मेनबोर्ड इश्यू २४ सप्टेंबरपर्यंत खुला राहील. प्राइस बँड १४० ते १४८ रुपये आणि लॉट साइज १०१ शेअर्स आहे. (लिस्टिंग: २९ सप्टेंबर, बीएसई आणि एनएसई)
-
हिमालय न्यूट्रावेदिक्स: २६.५० कोटी रुपयांचा इश्यू (प्राइस बँड: १०० ते १०६ रुपये). (लिस्टिंग: २९ सप्टेंबर, बीएसई एसएमई)
-
आनंद सीमलेस: २५.५२ कोटी रुपयांचा हा इश्यू ७२ रुपये फिक्स प्राईसवर उपलब्ध असेल. (लिस्टिंग: २९ सप्टेंबर, बीएसई एसएमई)
-
-
२३ सप्टेंबर:
-
एलिवेट कॅम्पसेस: २,१०० कोटी रुपयांचा महा-इश्यू २५ सप्टेंबरपर्यंत खुला राहील. प्राइस बँड ३४३ ते ३६२ रुपये आहे. (लिस्टिंग: ३० सप्टेंबर, बीएसई आणि एनएसई)
-
आरमी इन्फोटेक: ३०० कोटी रुपयांचा इश्यू (प्राइस बँड: ३५० ते ३७५ रुपये). (लिस्टिंग: ३० सप्टेंबर, बीएसई आणि एनएसई) (Stock Market Update India)
-
स्वास्तिका इन्फ्रा: १६०.८८ कोटी रुपयांचा इश्यू (प्राइस बँड: १७५ ते १८५ रुपये). (लिस्टिंग: ३० सप्टेंबर, बीएसई आणि एनएसई)
-
ॲड्रॉएट इंडस्ट्रीज: १५०.७१ कोटी रुपयांचा मेनबोर्ड इश्यू (प्राइस बँड: १२६ ते १३४ रुपये). (लिस्टिंग: ३० सप्टेंबर, बीएसई आणि एनएसई)
-
याशिवाय, लिक्विड डिजिटल इंडिया, पूजा लॉजिस्टिक्स, एसके ऑफसेट, साई ऊर्जा इंडो, युनिटेक फायबर्स आणि कोरइंटेग्रा कन्सल्टिंग यांचे एसएमई आयपीओ देखील याच दिवशी खुले होणार आहेत.
-
पुणे: ४६ वर्षीय बिझनेसमनला पत्नीसोबत खोटं बोलून मलेशियाला जाणं चांगलंच महागात पडलं आहे. बिझनेसच्या कामानिमित्त मलेशियाला जातोय, असं बायकोला सांगून ...
-
२४ आणि २५ सप्टेंबर:
-
ए-वन स्टील्स: ४०५ कोटी रुपयांचा आयपीओ २४ सप्टेंबर रोजी खुला होईल (प्राइस बँड: ३८५ ते ४०५ रुपये). (लिस्टिंग: १ ऑक्टोबर)
-
बेंचमार्क इन्फोटेक सर्व्हिसेस: २५ सप्टेंबर रोजी लाँच होणाऱ्या या इश्यूची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
-
या आठवड्यात होणारे प्रमुख शेअर्स लिस्टिंग:
-
२१ सप्टेंबर: मनिका प्लास्टेक, इंजेक्टो पॉलिमर्स आणि सेंच्युरी बिझनेस मीडिया.
-
२२ सप्टेंबर: वामा वोव्हेनफॅब, शक्ती पॉलिटार्प आणि क्वांटो ॲग्रोवर्ल्ड.
-
२३ सप्टेंबर: हिरो मोटर्स, एसएस रिटेल आणि जिंदाल सुप्रीम.
-
२४ सप्टेंबर: सोना सिलेक्शन इंडिया, स्पेक्ट्राए टेक्नॉलॉजी सोल्युशन्स आणि खेडिया ऑटोकॉम्प.
-
२५ सप्टेंबर: ॲक्सियम गॅस इंजिनिअरिंग.(IPO Update 2026)
एकाच आठवड्यात मोठ्या संख्येने आयपीओ दाखल होत असल्याने आणि शेअर्सचे लिस्टिंग होत असल्याने शेअर बाजारात एकच चलबिचल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा पर्वणी ठरणार आहे.






