नवी मुंबई: गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये सर्वाधिक उत्सुकतेची गोष्ट असते ती डेकोरेशनची... गणेशोत्सव सण हा खरंतर ...
परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एमएसआरटीसीच्या ताफ्यात १७० आसनी व्होल्वो बसेस आणि ३० स्लीपर बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर महामंडळाकडून व्होल्वो बसेसचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह, आरामदायी आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट आहे.” असे सरनाईक म्हणाले.
नवीन बसेस २५० किमी पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी प्रस्तावित असून, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस सेवा नियोजित आहे. महामंडळ काही तासांच्या प्रवासासाठी ४५ आसनी बसेसचा विचार करत आहे. तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी स्लीपर सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांची मागणी, प्रवासाचा वेळ, सध्याच्या सेवा आणि प्रत्येक मार्गाची आर्थिक व्यवहार्यता यांचा अभ्यास करून मार्गांची निवड केली जाईल. खाजगी बस चालकांनी वातानुकूलित सुविधा, आरामदायक आसनव्यवस्था, स्लीपर बर्थ आणि सोयीस्कर बुकिंगचे पर्याय देऊन एक मोठा ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.
अमरावती : बडनेऱ्याजवळील दाभा परिसरात बंद घरातून ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वैशाली असे मृत महिलेचे नाव असून, ती गेल्या चार ...
राज्याच्या कानाकोपऱ्यातील एसटीचे विस्तृत जाळे आणि प्रवाशांचा एसटीवर असलेला विश्वास. या विश्वासाच्या माध्यमातूनच प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आणण्याचा मानस परिवहन खात्याचा आहे. एम.एस.आर.टी.सी. नवीन सेवा अधिक डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. आपल्या सध्याच्या ऑनलाइन आरक्षण प्रणालीव्यतिरिक्त, प्रवाशांना खाजगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मद्वारे तिकीट बुक करण्याची सुविधा देण्याचा महामंडळाचा मानस आहे. प्रवासी आपल्या मोबाइल फोनवरून वेळापत्रक, मार्ग आणि सीटची उपलब्धता तपासू शकतील तसेच आरक्षण करू शकतील.
नव्या व्होल्वो बसेसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, बसमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रवाशांना आवश्यक माहिती आणि सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. यामुळे एसटीच्या पारंपरिक प्रवासी सेवेबरोबरच हॉस्पिटॅलिटी आणि ग्राहकसेवेच्या आधुनिक संकल्पनेचा समावेश होणार असून, प्रवाशांना अधिक सुखकर आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.