बिग बॉस 20 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खान ट्रोलर्सवर चांगलाच भडकला. वयावरून आणि शारीरिक बदलांवरून ट्रोल करणाऱ्यांचा त्याने तीव्र शब्दांत समाचार घेतला. यावेळी सलमान खान इतका रागावला की त्याने कॅमेऱ्यासमोरच स्वतःचे शर्ट काढून दाखवले. तसेच चेहऱ्यावरील मेकअप काढून त्याने ट्रोलर्सना थेट आव्हान दिले. ( Body Shaming)
सलमान म्हणाला की, प्रत्येक शोमध्ये लोकांच्या वयावर भाष्य केले जाते. मी 60 वर्षांचा झालो आहे, मग नक्की कोणत्या गोष्टीवरून कोणाला ट्रोल करायचे असते? लोकांचे वजन, लूक, हसणे, अपयश किंवा एखाद्या स्त्रीचे आई होणे यावरून टीका केली जाते, जे अत्यंत चुकीचे आहे. ट्रोल करण्यापूर्वी लोकांनी स्वतःचा चेहरा आणि शरीर पाहिले पाहिजे. प्रेक्षकांनी चित्रपटाचे तिकीट खरेदी केले आहे, कलाकारांना विकत घेतलेले नाही. ज्या दिवशी कलाकार उत्तर देतील, त्या दिवशी ट्रोलर्सना लपायला जागा मिळणार नाही. ( Salman Khan News)
सलमान खानने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कतरिनाच्या समर्थनार्थ उभे राहून ट्रोलर्सची बोलती बंद केल्याबद्दल अनेकांनी सलमानच्या या कृतीचे कौतुक केले आहे. ( Entertainment News)