मुंबई : वाढत्या वीजबिलातून दिलासा मिळवण्यासोबतच घरगुती पातळीवर सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ राबवली जात आहे. या योजनेत पात्र कुटुंबांना घराच्या छतावर ग्रिडशी जोडलेली रूफटॉप सोलर यंत्रणा बसवण्यासाठी केंद्राकडून कमाल ७८ हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान मिळू शकतं. (PM Surya Ghar Yojana)
या योजनेचा उद्देश घरगुती वीज निर्मितीला चालना देण्यासोबतच पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. सोलर यंत्रणेची क्षमता जितकी असेल, त्यानुसार केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम निश्चित केली जाते.
Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारत-बांगलादेश महिला ...
किती क्षमतेच्या सोलरसाठी किती सबसिडी?
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पहिल्या २ किलोवॉट क्षमतेसाठी प्रति किलोवॉट ३० हजार रुपये अनुदान दिलं जातं. म्हणजेच २ किलोवॉटच्या यंत्रणेसाठी ६० हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. (PM Surya Ghar Yojana)
यानंतर २ किलोवॉटपेक्षा अधिक क्षमतेच्या यंत्रणेसाठी अतिरिक्त १ किलोवॉटवर १८ हजार रुपये अनुदान दिलं जातं. त्यामुळे ३ किलोवॉटपर्यंतच्या यंत्रणेसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या सबसिडीची कमाल रक्कम ७८ हजार रुपये इतकी होते.
महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या अनुदानाची मर्यादा ३ किलोवॉटपर्यंत आहे. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने ५ किंवा १० किलोवॉट क्षमतेचा सोलर प्लांट बसवला, तरी केंद्राकडून मिळणारी सबसिडी ७८ हजार रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. काही राज्य सरकारांकडून याशिवाय स्वतंत्र अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकतं. (PM Surya Ghar Yojana)
मुंबई : गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटी परिसरात मोठी गर्दी होण्याची ...
सबसिडीसाठी अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्जाची प्रक्रिया ‘पीएम सूर्य घर’ नॅशनल पोर्टलच्या माध्यमातून केली जाते.
सुरुवातीला पोर्टलवर जाऊन संबंधित राज्य आणि वीज वितरण कंपनी (DISCOM) निवडावी लागते. त्यानंतर आवश्यक माहिती भरून नोंदणी करावी. ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लॉग इन करून ऑनलाइन अर्जातील आवश्यक तपशील भरावा आणि अर्ज सबमिट करावा.
अर्ज केल्यानंतर संबंधित DISCOM कडून तांत्रिक व्यवहार्यतेची तपासणी केली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर योजनेअंतर्गत नोंदणीकृत विक्रेत्याची निवड करता येते. त्यानंतर निवडलेला विक्रेता घराच्या छतावर सोलर पॅनेल आणि संबंधित यंत्रणा बसवतो. (PM Surya Ghar Yojana)
जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर हवाई तळावर भारत आणि जपानच्या हवाई दलांमध्ये ‘वीर गार्डियन-2026’ हा संयुक्त सराव सुरू आहे. रविवारी या सरावाला विशेष महत्त्व ...
सोलर बसवल्यानंतर पुढची प्रक्रिया काय?
सोलर प्लांट बसवल्यानंतर त्यासंबंधी आवश्यक माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागते. त्यानंतर नेट मीटरिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाते. संबंधित DISCOM कडून सोलर यंत्रणेची पाहणी केल्यानंतर सर्व निकष पूर्ण असल्यास कमिशनिंग सर्टिफिकेट जारी केलं जातं.
यानंतर सबसिडी मिळवण्यासाठी बँक खात्याची माहिती आणि आवश्यक कागदपत्रं, जसे की कॅन्सल चेक किंवा पासबुकची प्रत, पोर्टलवर अपलोड करावी लागते. कागदपत्रांची पडताळणी आणि अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT)च्या माध्यमातून लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. (PM Surya Ghar Yojana)
सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत सबसिडी जमा केली जाते.
मुंबई : गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी विजेच्या धक्क्याच्या घटना घडल्या आहेत. जोगेश्वरी पूर्व येथील श्याम नगर ...
सोलर बसवण्यासाठी कर्जाचीही सुविधा
सोलर यंत्रणा बसवण्याचा खर्च एकरकमी करणे शक्य नसलेल्या पात्र कुटुंबांसाठी कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून तारणाशिवाय कर्ज मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या कर्जावर तुलनेने सवलतीचा व्याजदर लागू होतो. दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२६ पर्यंत रेपो रेट + ५० बेसिस पॉईंट्स, म्हणजे वार्षिक ५.७५ टक्के दराने कर्ज उपलब्ध होत होतं. कर्जाच्या परतफेडीसाठी १० वर्षांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो. (PM Surya Ghar Yojana)
त्यामुळे घराच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवून वीजखर्च कमी करण्यासोबतच सुरुवातीचा आर्थिक भार टप्प्याटप्प्याने व्यवस्थापित करण्याचा पर्यायही पात्र कुटुंबांसमोर उपलब्ध आहे.





