Monday, September 21, 2026

Prime Minister Meloni : इटलीच्या शाळांमध्ये बुरखा-नकाबवर बंदी येणार; पंतप्रधान मेलोनींचा मोठा निर्णय, कारण असं की...

Prime Minister Meloni : इटलीच्या शाळांमध्ये बुरखा-नकाबवर बंदी येणार; पंतप्रधान मेलोनींचा मोठा निर्णय, कारण असं की...

इटली : युरोपियन देशात बुरख्यावर बंदी घालण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत. फ्रान्स, (France) ऑस्ट्रिया (Austria) आणि बेल्जियमनंतर ( Belgium) आता इटलीतही बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू झाली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या विषयात हात घालत याबाबतची महत्त्वाची घोषणा केली आहे. मेलोनी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात स्पष्ट केलं की, सरकारी शाळांमध्ये चेहरा झाकण्यावर बंदी घालावी. इतकंच काय तर सरकारी शाळांमध्ये विदेशी विद्यार्थ्यांची संख्याही मर्यादीत ठेवण्यावर जोर दिला. इटलीत सर्वाधिक स्थलांतरित येत असतात. विशेष म्हणजे मुस्लिमबहुल देशातून येणाऱ्या लोकांमुळे इटलीचं राजकारण आणि सार्वजनिक जीवनावर सर्वाधिक प्रभाव पडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे इटली सरकारने धोरणात्मक पावलं उचलण्याची तयारी केली आहे. यासाठी शाळांमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. यासाठी संसदेत लवकरच विधेयक मांडलं जाणार आहे. इटली सरकारने विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतरित होण्यासाठी 60 दिवसांच्या आत संसदेची मंजुरी आवश्यक असेल.

इटलीच्या संसदेत विधेयक मांडलं जाणार

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या संदर्भात एक विधेयक संसदेत मांडलं जाईल याबाबतची माहिती दिली. यात शाळेत बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याबाबत कायदा असेल. त्याचबरोबर विदेशी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादीत ठेवण्यावर जोर असेल. ब्रदर्स ऑफ इटली या आपल्या पक्षाच्या युवा संघटनेच्या जियोवेंतू नाजियोनालेच्या फेनिक्स कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मेलोनी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या की, 'संसदेच्या पटलावर एक विधेयक मांडलं जाणार आहे. या कायद्यानुसार प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या मर्यादीत ठेवली जाणार आहे. तसेच शाळांमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी घातली जाणार आहे.'(Prime Minister Meloni)

...तर असं चालणार नाही

“तुम्ही शाळेत चेहरा न झाकताच गेले पाहिजे, आणि इटलीमध्ये कोणीही, खऱ्या किंवा तथाकथित परंपरेच्या नावाखाली, एखाद्या तरुणीने स्वतःला झाकून घ्यावे असा निर्णय घेऊ शकत नाही,” असे मेलोनी यांनी म्हटल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >