Monday, September 21, 2026

Mumbai News: मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा, रस्त्यामध्ये हरवलेली 2 लाख 90 हजार रूपये असलेली पिशवी मालकाला शोधून दिली...

Mumbai News: मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा, रस्त्यामध्ये हरवलेली 2 लाख 90 हजार रूपये असलेली पिशवी मालकाला शोधून दिली...
मुंबई: मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीचे हरवलेले तब्बल 2 लाख 90 हजार रूपये शोधून दिले आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या ह्या महत्त्वाचे कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई आणि शहरामध्ये कुठेही आणि केव्हाही घटना घडूद्यात पहिले ते हजर होतात. मुंबईतील मरिन ड्राईव्हच्या मॅडम कामा रोड परिसरामध्ये एका व्यक्तीची लाखो रूपये असलेली पिशवी चोरीला गेली होती. चोरीला गेलेली ही पिशवी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बॅग शोधून दिली आहे. मुंबई पोलिसांकडून रविवारी दुपारी ती पिशवी ज्याची होती, त्याकडे सुपुर्द करण्यात आली.
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास, एल डिव्हिजन-2 येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गावडे यांना मॅडम कामा रोड परिसरात एक पिवळी बॅग आढळली. त्या बॅगेत तब्बल 2,90,000 रुपयांची रोख रक्कम होती. गावडे यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राणे यांच्या मदतीने ती बॅग पोलीस स्टेशनमध्ये आणली आणि स्टेशन अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक वैशाली लावटे यांच्याकडे जमा करण्यात आली. ती पिशवी सहायक पोलीस उपनिरिक्षकांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांच्या पथकाकडून त्या पिशवीच्या मालकाचा शोध घेतला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या निर्देशानुसार, गुन्हे शोध पथकाने बॅग हरवलेल्या व्यक्तीला ओळखण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांनी चर्चगेटपरिसरातील श्रीपाद सोसायटीच्या रहिवासीची ही पिशवी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या टीमकडून त्या व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांना चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने ही रक्कम घर खर्चासाठी त्याच्या सासऱ्यांकडून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. घरी परतत असताना लाखोंचा ऐवज असलेली पिशवी खाली पडली असेल अशी शक्यता त्या व्यक्तीने दिली. आवश्यक पडताळणी केल्यानंतर, मरीन ड्राइव्ह पोलिसांनी 20 सप्टेंबर रोजी त्या व्यक्तीला संपूर्ण 2 लाख 90 हजार रूपयांची रोख रक्कम परत केली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >