Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या VIP दर्शनाला डबेवाल्यांचा विरोध; जलद दर्शनाच्या नावाने भाविकांची फसवणूक

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक मुंबईत येतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख असल्याने बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक तासनतास रांगेत उभे राहतात. मात्र, सामान्य भाविकांना दीर्घकाळ रांगेत थांबावे लागत असताना VIP व्यक्तींना विशेष दर्शन दिले जात असल्याच्या मुद्द्यावरून मुंबई डबेवाला असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे.  ( Lalbaugcha Raj)



VIP रांग मुद्द्यावरून वातावरण तापलं



लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सामान्य नागरिक आणि VIP व्यक्तींसाठी स्वतंत्र रांगा असतात. त्यामुळे सामान्य भाविकांना बराच वेळ रांगेत थांबावे लागते, असा आक्षेप डबेवाल्यांनी ( Mumbai Dabbawala Association) घेतला आहे. दर्शन व्यवस्थेत सर्व भाविकांना समान वागणूक मिळावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. गर्दीचे योग्य नियोजन करावे आणि VIP दर्शनाची पद्धत बंद करावी, अशी मागणीही मुंबई डबेवाला असोसिएशनकडून करण्यात आली आहे. (VIP Line Culture)



दर्शनासाठी अनेक भाविकांची फसवणूक


दरम्यान, लालबागच्या राजाच्या जलद दर्शनाच्या नावाने भाविकांची फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे. काळाचौकी पोलिसांनी या प्रकरणी 18 वर्षीय प्रणव सुरेशकुमार यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यादवने 4 भाविकांना जलद चरणस्पर्श दर्शन करून देण्याचे सांगून त्यांच्याकडून एकूण 3,400 रुपये घेतल्याचा आरोप आहे.


तक्रारदार आणि त्याच्या मित्रांनी यादवला ऑनलाइन माध्यमातून 800 रुपये दिले, तर 2,600 रुपये रोख दिले. पैसे घेतल्यानंतर दर्शनाची व्यवस्था करून देतो, असे सांगून यादव तेथून निघून गेला. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही तो परत न आल्याने भाविकांनी त्याचा शोध घेतला.


त्यानंतर दर्शनाची कोणतीही व्यवस्था नसल्याचे समोर आल्याचा आरोप तक्रारदाराने केला. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी BNS कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

JW Marriott Mumbai : 5स्टार हॉटेलमधील किळसवाणा प्रकार! जेवताना टेबलावर आढळला झुरळ; डॉक्टरांनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई : पंचतारांकित हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असताना टेबलवर झुरळ आढळल्याचा प्रकार समोर आला आहे.

Lalbaugcha Raja :'रोहित... रोहित...'च्या जयघोषाने दुमदुमला लालबागचा दरबार! 'हिटमॅन' पत्नीसह बाप्पाच्या चरणी!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा रविवारी पत्नी रितिका सजदेह हिच्यासोबत लालबागच्या

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन यांचा सवाल; ‘सत्ता गेल्यावरही एवढी दादागिरी का?’

मुंबई : दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून दिशाचे वडील सतीश सालियन यांनी काही गंभीर आरोप करत आपली

Ganpati Visarjan : 'पुढच्या वर्षी लवकर या'! गणेश विसर्जनाच्या 7व्या दिवशी 18,818 मूर्तींचे विसर्जन; कोणतीही अनुचित घटना नाही

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान सुरू असलेल्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रक्रियेत सातव्या दिवशीही मोठ्या संख्येने

Maharashtra weather : सावध राहा! पुढील 2-3 दिवस प्रचंड महत्त्वाचे; पावसाबाबत हवामान विभागाचे मोठे अपडेट

मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून

Short Circuit : लालबागच्या राजाच्या मंडपात मुखदर्शनाच्या रांगेत शॉर्टसर्किट; भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण