Asian Games 2026 : MMA सुचिका तारियालला 700 ग्रॅम वजन महागात पडलं, असा गमावला हातातला सामना

नागोया : एशियन गेम्स 2026 स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. भारताने या स्पर्धेत पदकांची लयलूट सुरू केली आहे. भारताच्या पदरात आणखी एक पदक पडलं. मात्र सुवर्ण पदकाची संधी हुकल्याने क्रीडाप्रेमींमध्ये निराशा आहे. मिक्स मार्शल आर्ट्स खेळाडू सुचिका तारियाल हीने एशियन गेम्स स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. पण तिचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न थोडक्यासठी हुकलं. सुचिका तिच्या डावपेचामुळे नाही तर एका नियमामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आऊट झाली. सुचिकाला गुणांच्या आधारावर नाही तर वजनाच्या आधारावर पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चला जाणून घेऊयात सुचिक तारियाल हिला 700 ग्रॅम वजन किती महागात पडलं ते (Suchika Tariyal MMA)



सुचिका तारियालचा असा झाला पराभव


60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत सुचिका तारियालचा सामना सिंगापुरची एमएमए खेळाडू हुई हून तेओ हीच्याशी सामना होता. या दोघांमध्ये कडवी झुंज होती. रेग्युलेशन टाइम आणि ओव्हरटाईमनंतरही पंचांना निर्णय देणं कठीण झालं होतं. सुरूवातीला पंचांनी तेओला घोषित केलं, पण यावर भारतीय संघाने आक्षेप नोंदवला. त्यानंतर पंचांनी सामन्याचं फुटेज पुन्हा पाहिलं आणि सामना ड्रॉ घोषित केला. पण असं असूनही सुचिकाला पराभूत घोषित करण्यात आलं.(Suchika Tariyal MMA)



सुचिका पराभूत होण्याचं कारण काय?


एशियन मिक्स्ड मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या नियमानुसार, सामना ड्रॉ झाला किंवा ट्रायब्रेकरमध्ये बरोबरीत सुटला तर सकाळच्या वजनाच्या आधारावर निर्णय घेतला जातो. हा नियम सुचिकाच्या पराभवाचं कारण ठरला. कारण या नियमानुसान वजन कमी असलेला खेळाडू विजेता घोषित केला जातो. सुचिकाच वजन जवळपास 59.2 किलोग्रॅम होतं. तर तेओचं वजन हे 58.5 किलोग्रॅम होतं. म्हणजेच सुचिकाचं वजन 700 ग्रॅम अधिक होतं. त्यामुळे तेओला अंतिम फेरीचं तिकीट दिलं गेलं. तर सुचिकाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या निर्णयानंतर सुचिकाला अश्रू अनावर झाले.(Suchika Tariyal MMA)



कांस्य पदकावर समाधान मानावं लागल्यानंतर काय म्हणाली सुचिका?


"तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने सामना पाहिला आणि मी खूपच उत्कृष्ट लढले असे मला सांगितले. मी पदकाचा रंग बदलू शकले नसले तरी, मी माझ्या देशवासियांच्या हृदयात स्थान मिळवू शकले याचा मला अभिमान आहे," असं सुचिका म्हणाली. "मला नियम चांगलेच माहीत आहेत की बरोबरी झाल्यास, कमी वजनाचा खेळाडू जिंकतो. पण केवळ याच आधारावर लढतीचा निकाल लागत नाही. तुम्ही ती लढत पाहिल्यास, मी स्पष्टपणे जिंकत होते. मी सर्व टेकडाउन्स यशस्वी केले. तिला माझ्यावर एकही टेकडाउन करता आला नाही, आणि ती फक्त हवेतच ठोसे मारत होती," असे सुचिका पुढे म्हणाली.(Suchika Tariyal MMA)

Comments
Add Comment

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाचा इंडोनेशियावर १७-१ असा दणदणीत विजय

नागोया: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आपले वर्चस्व कायम राखत आणखी एका धमाकेदार

Asian Games 2026 : सुचिका तरियालने रचला इतिहास ! मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये भारताला पहिलं कांस्यपदक

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये (MMA) इतिहास रचला आहे. 36 वर्षीय

Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला आणखी एक रौप्यपदक, पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल टीमने मिळवून दिलं पदक

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने

Sports minister India : क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून जपानमध्ये 'संडेज ऑन सायकल'चे नेतृत्व; आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा वाढवला उत्साह!

नागोया (जपान) : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जपानमधील नागोया येथील मेईजो

Asian Games 2026 : भारतीय पुरुष हॉकी संघाची इंडोनेशियावर १३-१ ने दणदणीत मात; दिलप्रीत सिंगचे तुफानी चार गोल!

नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या मोहिमेची भारतीय पुरुष हॉकी संघाने अत्यंत दणदणीत आणि ऐतिहासिक

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांची दुहेरी पदकांसह दमदार सुरुवात; एलावेनिलला वैयक्तिक रौप्य पदक

नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या मोहिमेची भारताने दमदार सुरुवात केली असून, स्पर्धेच्या