Monday, September 21, 2026

Rashmika Mandanna Mysaa : सोज्वळ अभिनेत्री झाली एकदम आक्रमक; बहुप्रतिक्षित ‘मैसा’ चित्रपटाचा थरारक टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Rashmika Mandanna Mysaa : सोज्वळ अभिनेत्री झाली एकदम आक्रमक; बहुप्रतिक्षित ‘मैसा’ चित्रपटाचा थरारक टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : आतापर्यंत सोज्वळ, रोमँटिक आणि ग्लॅमरस भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आता एका पूर्णपणे नवीन आणि डरकाळी फोडणाऱ्या ॲक्शन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या आगामी ‘मैसा’ या पॅन इंडिया चित्रपटाचा थरारक टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात रश्मिकाचा अत्यंत आक्रमक आणि रौद्र अंदाज पाहायला मिळत आहे. हातात कोयता, अंगावर काटा आणणारे थरारक प्रसंग आणि पाण्याखालील जीवघेणी ॲक्शन दृश्यांमुळे या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.(Rashmika Mandanna Mysaa)

टीझरमधील खास आकर्षण आणि कथा

‘मैसा’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक रवींद्र पुल्ले दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. संपूर्णपणे महिला-केंद्रित ॲक्शनपटा म्हणून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. टीझरची सुरुवात रश्मिकाच्या भावूक संवादाने होते, जिथे ती “मी थकलेय, मी थांबलेय, मी हरलेय” असे म्हणताना दिसते. मात्र, या हतबलतेनंतर तिचा जो आक्रमक आणि रौद्र अवतार समोर येतो, तो थक्क करणारा आहे. कठीण परिस्थितीत अडकलेली आणि शत्रूंविरुद्ध तलवार किंवा कोयता उगारून उभी ठाकलेली तिची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथानकाची तीव्रता अधोरेखित करते.

विशेष म्हणजे, या चित्रपटात केवळ तुफान ॲक्शनच नाही, तर एक संवेदनशील भावनिक धागाही गुंफण्यात आला आहे. यात वडील आणि मुलीच्या नात्यातील जिव्हाळा आणि संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आला आहे, ज्यामुळे चित्रपटातील ड्रामा आणखी घट्ट होतो.(Rashmika Mandanna Mysaa)

कधी होणार प्रदर्शित?

रश्मिकाचा हा नवा लूक आणि तिच्यातील खमकुमी पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या या डॅशिंग लूकची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांना एका नव्या रुपात भुरळ पाडणारा हा बहुप्रतिक्षित चित्रपट आगामी 27 नोव्हेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. आता मोठ्या पडद्यावर रश्मिकाची ही ॲक्शन ट्रीट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >