Nashik Crime News: नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात सोमवारी सकाळी उभ्या असलेल्या मारुती ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. मात्र, आता पोलिस तपासातून मृताची ओळख समोर आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटली
ओमनीमध्ये आढळलेला मृतदेह शुभम बाळू पवार (वय 41) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. ते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांना हा मृतदेह ओमनीच्या मागील दोन सीटमधील मोकळ्या जागेत आढळून आला. मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले असून, वाहनाच्या आतपासून रस्त्यापर्यंत रक्ताचे ओघळ आढळले.
Nashik Crime News : 8 महिन्यांची चिमुकली अखेर सापडली, पण चिमुकली येवल्यात कशी पोहोचली ? नांदगाव प्रकरणाचं गूढ कायम
Nashik Crime News : नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी परिसरातून 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री बेपत्ता झालेल्या आठ महिन्यांच्या चिमुकलीचा अखेर शोध लागला आहे. तब्बल ...
नागरिकांना संशय आल्यानंतर पोलिसांना माहिती
मालेगाव स्टॅण्ड परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपासासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, एमएच 15 जीआर 8974 क्रमांकाची ही मारुती ओमनी मोहन भैरू भगत, रा. तळेगाव, महिरावणी यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. ही व्हॅन मालेगाव स्टॅण्ड परिसरात मागील तीन दिवसांपासून उभी असल्याची प्राथमिक माहिती आहे. परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिक आणि भाविकांची वर्दळ असतानाही हा प्रकार उशिराने समोर आल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मृत्यू नेमका कसा झाला ?
शुभम पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत कशी झाली? त्यांचा मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला? ते या वाहनात कसे आले? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासातून मृत्यूचं नेमकं कारण आणि
घटनेची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पंचवटी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.