Ketan Agrawal Murder Case : 'त्या' फोटोंमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवं वळण; पोलिसांना मिळाला सर्वात मोठा पुरावा!

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती आणखी काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त लग्नाची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या काही पुराव्यांचाही समावेश केला आहे. (Ketan Agrawal Murder Case) या प्रकरणी पोलिसांनी 5000 हून अधिक पानांची चार्टशीट दाखल केली असून या प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे.



सिंदूर अन् गळ्यात हार घातल्याचा फोटो


पोलिसांच्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये सिया आणि चेतन काही मित्रांसोबत राजस्थानला गेले होते. यावेळी त्यांनी खाटूश्याम मंदिरात गुपचूप लग्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. तपासादरम्यान पोलिसांना दोघांचा एक फोटो मिळाला. या फोटोमध्ये सियाच्या भांगेत सिंदूर दिसत असून चेतनच्या गळ्यात फुलांचा हार आहे. हा फोटो पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर केला आहे.


तपासानुसार, सिया आणि चेतन यांच्यात ऑक्टोबर 2025 पासून जवळीक वाढली होती. त्यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. राजस्थानला जाण्यासाठी दोघांनी सुरुवातीला विमानाचे नियोजन केले होते. मात्र विमानसेवा रद्द झाल्यानंतर त्यांनी रेल्वेने राजस्थान गाठले. खाटूश्याम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. याच ठिकाणी लग्न झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र लग्नाच्या वेळेचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेले नाही. ( Ketan Agrawal)


दरम्यान, 18 जून 2026 रोजी केतनच्या हत्येनंतर आरोपींच्या हालचालींची माहितीही पोलिसांनी तपासात नोंदवली आहे. केतनला लोहगड किल्ल्यावरून सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलल्यानंतर चेतन दुचाकीवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथे त्याने मिसळ खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. किल्ला आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा क्रम तपासला आहे.


Comments
Add Comment

इयत्ता १०वी आणि १२वीच्या सीबीएसई बोर्डच्या परीक्षा जाहीर; १६ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात

सीबीएसई बोर्डच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

अन्न- औषध प्रशासनाचा हेअर ऑईल कंपनीला दणका, खोटी जाहिरात केल्यामुळे नाशिकमध्ये धडक कारवाई

मुंबई: इन्स्टाग्राम, फेसबूक यांसारख्या सोशल मीडियावरून टक्कल असलेल्या व्यक्तींना केस उगवणे आणि केसांची वाढ

Pune Airport: पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, बँकॉकहून ड्रॅगन फ्रूटच्या पॅकेटमध्ये केली जात होती गांजाची तस्करी

पुणे: अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात एक मोठे यश मिळवत, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने

Farmers Relief: दुष्काळग्रस्त 87 लाख 45 हजार शेतकऱ्यांना 4 हजार 372 कोटींची दिवाळी अग्रीम मदत

मुंबई(सुहास शेलार): राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा

Ahilyanagar News: टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना फराळाचे वाटप, पुण्याच्या आनंद यात्री मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये सध्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळी सणाचा

Ahilyanagar Diwali News: वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून उजळले संस्कारांचे दीप; जेएसएस गुरुकुलचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आनंद आणि नवीन कपड्यांची खरेदी नव्हे, तर