स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने (Vivo) आपली अत्यंत अपेक्षित आणि नवीन फ्लॅगशिप 'विवो एक्स५००' (Vivo X500) मालिका चीनमध्ये अधिकृतपणे लाँच केली आहे. या नवीन लाँचिंगमध्ये कंपनीने तीन शानदार स्मार्टफोन्स सादर केले आहेत, ज्यामध्ये विवो एक्स५००, विवो एक्स५०० प्रो आणि टॉप-एनड विवो एक्स५०० प्रो मॅक्स यांचा समावेश आहे.(Vivo X500 China launch)
किंमत आणि उपलब्धता
• Vivo X500: बेस मॉडेलची (12GB + 256GB) किंमत CNY 5,499 (अंदाजे रु. 79,000) पासून सुरू होते, तर हाय-एंड 1TB मॉडेलची किंमत CNY 6,999 (अंदाजे रु. 1,00,000) आहे. • Vivo X500 Pro: या मॉडेलची किंमत CNY 6,499 (अंदाजे रु. 93,000) ते CNY 8,499 (अंदाजे रु. 1,22,000) दरम्यान आहे. • Vivo X500 Pro Max: या मालिकेतील सर्वात शक्तिशाली फोनची किंमत CNY 6,999 (अंदाजे रु. 1,00,000) पासून सुरू होऊन टॉप व्हेरिएंटसाठी CNY 8,999 (अंदाजे रु. 1,29,000) पर्यंत जाते.
उपलब्धता: विवो एक्स500 प्रो मॅक्स आणि विवो एक्स500 हे फोन चीनमध्ये 24 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असतील, तर विवो एक्स500 प्रो 29 सप्टेंबरपासून खरेदी करता येईल. हे सर्व फोन्स 'विवो चायना'च्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध असतील.
Mumbai : चेन्नई सुपर किंग्सने भारताचा माजी वेगवान डावखुरा गोलंदाज झहीर खान यांची २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामासाठी नवीन मुख्य प्रशिक्षक ...
मुख्य वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स
• चिपसेट आणि प्रोसेसर: विवो एक्स500 प्रो आणि प्रो मॅक्स हे दोन्ही स्मार्टफोन्स शक्तिशाली मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो (2nm) चिपसेटवर चालतात, जो 4.55GHz पर्यंतचा पीक क्लॉक स्पीड देतो. तर स्टँडर्ड विवो एक्स500 मध्ये डायमेन्सिटी 9600M चिपसेट देण्यात आला आहे. • बैटरी आणि चार्जिंग: स्टँडर्ड विवो एक्स500 मध्ये 7,500mAh, प्रो मॉडेलमध्ये 6,510mAh आणि प्रो मॅक्स मॉडेलमध्ये तब्बल 8,000mAh क्षमतेची अवाढव्य बॅटरी देण्यात आली असून, हे सर्व फोन्स 90W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. • कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी या सिरिजमध्ये झाईस-ट्यून (Zeiss) कॅमेरे दिले आहेत. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 200-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो, जो उत्कृष्ट फोटोग्राफीचा अनुभव देतो.
आधुनिक तंत्रज्ञान, पॉवरफुल बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा यामुळे विवोची ही नवीन मालिका टेक बाजारात मोठी खळबळ माजवण्यास सज्ज आहे.(Vivo X500 China launch)






