थरारक घटना! AC चा स्फोट अन् धुराचे लोट; ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं ?

आदिलाबाद : तेलंगणातील आदिलाबाद येथील 'राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (Rajiv Gandhi Institute Of Medicle Sciances) रुग्णालयातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या विशेष नवजात देखभाल कक्षात (SNCU) शॉर्टसर्किटमुळे एसीचा (AC) भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत धुराने गुदमरून आतापर्यंत ३ चिमुकल्या नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये अवघ्या ५ दिवसांच्या एका बालकाचाही समावेश आहे. दुर्घटनेच्या वेळी वॉर्डात २४ बालके उपचार घेत होती. घटनेचे गांभीर्य ओळखून २० हून अधिक बालकांना तातडीने इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.





धुराचे लोट आणि मध्यरात्री उडालेला गोंधळ


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री ११:४० वाजण्याच्या सुमारास घडली. एसी युनिटमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण आग लागली आणि काही क्षणांतच संपूर्ण SNCU वॉर्डात धुराचे साम्राज्य पसरले. वॉर्डात ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणे असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयातील कर्मचारी, अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. गंभीर स्थितीत असलेल्या २० हून अधिक बालकांना सुपर स्पेशालिटी आणि परिसरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये तातडीने हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान निजामाबाद येथे एका बालकाने प्राण सोडले, तर आदिलाबादमध्ये दोघांचा मृत्यू झाला.



अग्निशामक दलामुळे मोठा अनर्थ टळला


घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग रुग्णालयाच्या इतर वॉर्डांमध्ये पसरली नाही. आदिलाबादचे जिल्हा जिल्हाधिकारी राजर्षी शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्यादरम्यान २६ आठवड्यांच्या एका प्री-मॅच्युअर (मुदतपूर्व जन्मलेल्या) बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. धुराचा त्रास झालेल्या इतर बालकांवर सध्या बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्हेंटिलेटर व अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.



उच्चस्तरीय चौकशीचे आदेश


या धक्कादायक घटनेनंतर जिल्हाधिकारी राजर्षी शाह आणि पोलीस अधीक्षक अखिल महाजन यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. "ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आग लागण्याचे नेमके कारण काय होते आणि यात प्रशासकीय किंवा तांत्रिक निष्काळजीपणा झाला आहे का, याची सखोल चौकशी केली जाईल," असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष बाधित बालकांना योग्य आणि वेळेवर वैद्यकीय उपचार मिळवून देण्यावर आहे. या दुर्घटनेमुळे मृत बालकांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Jamui police encounter : खाकीचा दणका! जमुईतील नराधमांची पोलिसांशी चकमक; मुख्य सूत्रधार नंदन यादवचा पायात गोळी; दुसऱ्याचा पाय मोडला

जमुई : बिहारमधील जमुई (Bihar News) येथे शाळकरी मुला-मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक गैरवर्तणूक प्रकरणातील आरोपींवर

RIMS Hospital : धक्कादायक! रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या वॉर्डला लागली आग; 3 चिमुकल्यांचा मृत्यू, 20 हून अधिक बालकांना हलवलं

तेलंगणा : तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) रुग्णालयात सोमवारी रात्री

Jamui Crime : भररस्त्यात मुलीला अडवून नको तिथे स्पर्श; व्हायरल व्हिडिओतील 'ती' धक्कादायक दृष्यं पाहून संतापाची लाट!

दहावीच्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तरुणांकडून त्रास; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 3 जणांना अटक जमुई :

National Film Awards 2026 : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी! अंतिम टप्प्यात तयारी, चित्रपटसृष्टीत उत्सुकता

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

IIT Bombay student suicide : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : डीन प्रा. सूर्यनारायण दुल्ला निलंबित; संस्थेकडून माफीनामा जारी

मुंबई : आयआयटी मुंबईतील (IIT Bombay) 'ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी' विभागाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या

India New Zealand FTA : भारताला दसऱ्याची मोठी भेट! भारत-न्यूझीलंड 'मुक्त व्यापार करार' २० ऑक्टोबरपासून लागू!

'ड्युटी फ्री' प्रवेशामुळे नक्की काय फायदा होणार ? नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील व्यापारी आणि