भारताचा टी20 क्रिकेटमध्ये द्विशतकी विजय, आतापर्यंत 10 संघांविरुद्ध असा आहे रेकॉर्ड

भारताने जापानविरुद्धचा सामना जिंकला आणि आपलं विजयाचं द्विशतक साजरं केलं. भारताने टी20 क्रिकेटमध्ये 200वा विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा सलग सातवा विजय ठरला आहे.  या विजयासह भारतीय संघ टी20 क्रिकेटमध्ये 200वा विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. याआधी अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आली नाही. भारताने या टी20 विजयाच्या शर्यतीत तीन टी20 वर्ल्डकप जिंकले आहे. 2007, 2024 आणि 2026 मध्ये भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. भारताने 200व्या विजयी प्रवासात श्रीलंकेला सर्वाधिक वेळा पराभवाची धूळ चारली आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध 23 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यानंतर भारताने क्रिकेटविश्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 22 वेळा पराभवाची धूळ चारली आहे. यात ऑस्ट्रेलियाकडून फक्त 12 सामन्यात पराभूत झाला आहे.


भारताने टी20 क्रिकेटमध्ये दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धही चांगली कामगिरी केली आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 21 सामन्यात विजय, तर 14 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर वेस्ट इंडिजविरुद्ध 20 सामन्यात विजय आणि 10 सामन्यात पराभूत झाला आहे. असं असलं तरी टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडचा संघ भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. इंग्लंडने भारताला सर्वाधिक वेळा म्हणजेच 16 वेळा पराभवाची धूळ चारली आहे. दुसरीकडे, भारतानेही 18 सामन्यात इंग्लंडला धोबीपछाड दिला आहे. तसं पाहिलं तर इंग्लंडच्या 16 पराभवामध्ये 4 पराभव तर मागच्या महिन्यात झाले आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील 4 सामने भारताने गमावले होते. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडचं आव्हान तयार झालं आहे.



भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 17 सामने झाले आहेत. त्यापैकी 14 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात पाकिस्तानची सरशी आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात मल्टीनेशन स्पर्धेतच आमनासामना होतो. त्यामुळे दोन्ही संघ फक्त मल्टीनेशन स्पर्धेत भिडतात. असं असताना भारताने आतापर्यंत दहा संघांविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. यात अफगाणिस्तान, युएई, नामिबिया, नेदरलँड, अमेरिका, हाँगकाँग, नेपाळ, स्कॉटलँड, ओमान आणि जापानविरुद्ध भारताने एकही सामना गमावलेला नाही.

Comments
Add Comment

Video: जापानविरुद्धच्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, शेवटच्या षटकात वाइडवर राडा, झालं असं की...

भारत आणि जापान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर काय होईल? अशी स्थिती होती. मात्र

Asian Games 2026: भारताच्या खात्यात सुवर्णपदक, आशिया कपनंतर एशियन गेम्समध्येही महिला संघाचा डंका

IND W vs SL W Final: एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या

हुश्शsss! जापानविरुद्ध कसं बसं जिंकलो, नेमकं काय झालं सामन्यात? शेवटच्या षटकात असा थरार रंगला

भारत आणि जापान यांच्यात मैत्रिपूर्ण टी20 सामना नुकताच पार पडला. या सामन्यात जापानने भारतीय संघाला विजयासाठी

IND vs JPN : अभिषेक शर्माचा जापानमध्ये नकोसा विक्रम, पहिल्याच चेंडूवर विकेट आणि नको त्या पंगतीत बसला

भारत आणि जापान यांच्यात मैत्रिपूर्ण सामना सुरू आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना फक्त 5 षटकांचा

CSK Head Coach: झहीर खान यलो आर्मीत! महेंद्रसिंह धोनीला आयपीएल 2027 स्पर्धेत करणार मार्गदर्शन

Mumbai : चेन्नई सुपर किंग्सने भारताचा माजी वेगवान डावखुरा गोलंदाज झहीर खान यांची २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीग

India vs Japan: भारत-जापान टी20 सामना होणार की नाही? श्रेयस अय्यरचं टेन्शन वाढलं! नेमकं काय घडतंय?

Japan : एशियन गेम्स 2026 स्पर्धेपूर्वी भारत आणि जापान यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. हा सामना सानो स्टेडियमममध्ये