Tuesday, September 22, 2026

हुश्शsss! जापानविरुद्ध कसं बसं जिंकलो, नेमकं काय झालं सामन्यात? शेवटच्या षटकात असा थरार रंगला

हुश्शsss! जापानविरुद्ध कसं बसं जिंकलो, नेमकं काय झालं सामन्यात? शेवटच्या षटकात असा थरार रंगला

भारत आणि जापान यांच्यात मैत्रिपूर्ण टी20 सामना रंगला. या सामन्यात जापानने भारतीय संघाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. खरं तर या सामन्यात भारताच्या पदरी निसटता विजय मिळाला असं म्हणायला हरकत नाही. भारत आणि जापान यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पाच षटकांचा करण्यात आला. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताला या पाच षटकात फार काही धावा करता आल्या नाही. भारताने 5 षटकात 4 गडी गमवून 32 धावा केल्या आणि विजयासाठी 33 धावांचं आव्हान दिलं. खरं तर जापानसाठीहे सोपं आव्हान होत. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. अखेर हा सामना रंगतदार वळणावर आला.

विजयी धावांचा पाठलाग करताना काय घडलं?

भारताने विजयासाठी दिलेल्या 33 धावांचा पाठलाग करताना जापानची सुरूवात अडखळत झाली. पहिल्या षटकात अक्षर पटेलने अवघ्या 2 धावा देऊन एक विकेट काढली. दुसऱ्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट काढली पण 8 धावा दिल्या. त्यामुळे तीन षटकात 25 धावांची गरज जापानला होती. रवि विष्णोईचं षटक टीम इंडियाला महागात पडलं. कारण या षटकात एकही विकेट मिळाली नाही, पण 10 धावा गेल्या. त्यामुळे 12 चेंडू आणि 15 धावा अशी स्थिती आली. त्यामुळे टीम इंडियाची धाकधूक वाढली. जापानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागतंय की काय? असं वाटलं. त्यानंतच चौथं षटक वॉशिंग्टन सुंदरने टाकलं आणि 7 धावा देत 1 विकेट काढली. त्यामुळे सहा चेंडूत 8 धावा अशी स्थिती आहे.

शेवटच्या षटकात काय झालं?

कर्णधार श्रेय्यस अय्यरने शेवटचं षटक अक्षर पटेलकडे सोपवलं. त्याने या षटकाचा पहिलाच चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव काढली आणि 4 चेंडूत 7 धावा अशी स्थिती आली. तिसरा चेंडू अक्षर पटेलने सलग दोन वाइ़ड टाकले आणि 4 चेंडूत 5 धावा अशी स्थिती आली. मग चेंडू निर्धाव टाकला. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर प्रत्येकी 1 धाव दिली आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावा अशा स्थितीत सामना पोहोचला. या चेंडूवर फक्त एक धाव आणि भारताने हा सामना फक्त 2 धावांनी जिंकला.


                            
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >