Jamui police encounter : खाकीचा दणका! जमुईतील नराधमांची पोलिसांशी चकमक; मुख्य सूत्रधार नंदन यादवचा पायात गोळी; दुसऱ्याचा पाय मोडला

जमुई : बिहारमधील जमुई (Bihar News) येथे शाळकरी मुला-मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक गैरवर्तणूक प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी नंदन यादव आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात नंदन यादवच्या पायाला दुखापत झाली आहे, तर त्याचा दुसरा साथीदार हरे राम या कारवाई दरम्यान पळून जाण्याच्या प्रयत्नात पायाला दुखापत होऊन जखमी झाला आहे. या दोन्ही आरोपींना तातडीने उपचारासाठी जमुईच्या सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिहार पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी (ADG) या पोलीस कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.



कायद्याचा बडगा आणि विशेष पथकाची स्थापना




याआधीच पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले होते, परंतु मुख्य सूत्रधारासह चार जण फरार होते. बिहार पोलिसांच्या अतिरिक्त महासंचालक के. एस. अनुपम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२८, ७४, ७५ आणि पॉक्सो (POCSO) कायद्यातील कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची सखोल आणि वेगाने चौकशी व्हावी यासाठी जमुईच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या (SDPO) नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.



व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क


सोशल मीडियावर या घटनेचा संतापजनक व्हिडिओ पसरल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या व्हिडिओमध्ये काही तरुण शाळकरी मुला-मुलीला अडवून त्यांच्याशी असभ्य वर्तन करताना आणि मुलीला अयोग्य स्पर्श करताना दिसत होते. प्रकरण राष्ट्रीय स्तरावर गाजल्यानंतर महिला आयोगानेही याची दखल घेतली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलत सर्व आरोपींची ओळख पटवून कारवाईला गती दिली.



पहाडी भागातील घटना; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह


तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना जमुई-लखीसराय मुख्य रस्त्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन पहाडी भागात संध्याकाळी ६:२५ ते ६:३० च्या दरम्यान घडली होती. या घटनेनंतर मुख्य रस्त्यावरील आणि आसपासच्या परिसरातील पोलीस गस्तीवर प्रश्न निर्माण झाले असून, पोलीस आता त्या भागातील सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करत आहेत. तपासात ज्या कोणाचा निष्काळजीपणा किंवा सहभाग आढळेल, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



नेमका प्रकार काय घडला होता ?


ही घटना १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. एका दुचाकीवरून जाणाऱ्या अल्पवयीन मुलगा आणि मुलीला काही रोडरोमिओ गुंडांनी रस्त्यात अडवून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जमुई पोलीस अधीक्षकांनी (SP) घटनेच्या सत्यतेला दुजोरा दिला. पोलिसांनी दोन्ही पीडित अल्पवयीन मुलांशी संपर्क साधून त्यांचे जबाब नोंदवून घेतले आणि त्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला होता.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशात 'मुरासू' चक्रीवादळाचा हाहाकार; 8 जणांचा मृत्यू, तब्बल 1900 कोटींहून अधिकचे अवाढव्य नुकसान!

अमरावती: आंध्र प्रदेशात 'मुरासू' (Murasu) चक्रीवादळाने अभूतपूर्व विध्वंस घडवला असून संपूर्ण राज्यात मानवी जीवनासह

SBI ची 904 कोटींची फसवणूक? किशोर बियाणी आणि फ्युचर रिटेलविरोधात CBI चा FIR!

मुंबई: देशातील अग्रगण्य रिटेल समूहांपैकी एक असलेल्या 'फ्युचर रिटेल लिमिटेड'च्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

इयत्ता १०वी आणि १२वीच्या सीबीएसई बोर्डच्या परीक्षा जाहीर; १६ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात

सीबीएसई बोर्डच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

दक्षिण दिल्लीतील किया कार शोरूमला भीषण आग; 7 जण जखमी, 12 ते 15 जणांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सैदुलाजाब परिसरात असलेल्या किया कार शोरूमला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची

स्पाइसजेटच्या मनमानीचा भडका! बंगळुरू विमानतळावर प्रवाशांचा संताप अनावर; अन् थेट कर्मचाऱ्यालाच.....

बंगळुरू: विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 5 नोव्हेंबर 2026 रोजी

Amit shah uttarakhand visit : उत्तराखंडला अमित शाहांची १५०८ कोटींची 'दिवाळी भेट'; राहुल बाबाच्या 'व्होट बचाओ यात्रे'वर कडाडून टीका

देहरादून : उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी