Monday, September 21, 2026

Ketan Aggarwal Murder : प्लीज! त्याची हत्या करू नका..' केतनच्या हत्येआधी नक्की काय घडलं? 2 साक्षीदाराने सगळंचं सांगितलं

Ketan Aggarwal Murder :  प्लीज! त्याची हत्या करू नका..' केतनच्या हत्येआधी नक्की काय घडलं? 2 साक्षीदाराने सगळंचं सांगितलं

पुणे :  पुण्यातील लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 5 हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात हत्येच्या कटाबाबत तसेच आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न झाल्याबाबत माहिती देण्यात आली आहे. ( Ketan Aggarwal Murder)

मध्यस्थीचा प्रयत्न फसला: दोन जणांनी थांबवूनही कट पुढेच ढकलला!
केतनच्या हत्येची योजना ही अचानक आखली गेली नव्हती; तिचा कट गेल्या अनेक दिवसांपासून शिजत होता.चार्जशीटमधील धक्कादायक माहितीनुसार, मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या व्यतिरिक्त या योजनेची पूर्वकल्पना आणखी दोघांना होती. जेव्हा या दोघांना केतनला इजा पोहचवण्याच्या किंवा त्याला थेट संपवण्याच्या षड्यंत्राबाबत समजलं, तेव्हा त्यांनी आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला. 'असं काही करू नका...' असा थेट आणि गंभीर सल्ला त्यांनी आरोपींना दिला होता.सियाच्या एका ओळखीच्या व्यक्तीने तर तिला गुन्हेगारीचा हा मार्ग सोडण्याचा कळकळीचा सल्ला दिला. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने एक मार्गही सुचवला— 'मी तुझ्या आणि चेतनच्या संबंधाबद्दल कुटुंबीयांना सांगतो... तुमच्या लग्नाबाबत बोलतो! पण असं गुन्हेगारी कृत्य करू नका!' हा वाद सामंजस्याने मिटवण्याचा एक शेवटचा पर्यायही समोर ठेवला गेला होता.
मात्र, डोक्यावर सूडाचे आणि गुन्ह्याचे भूत बसलेल्या आरोपींवर या कोणत्याही उपदेशाचा परिणाम झाला नाही. सर्व सल्ले, विनंत्या बाजूला सारून आरोपी केतनचा काटा काढण्यावर आणि त्याची हत्या करण्यावर ठाम राहिले. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरुवातीला केतनची हत्या करण्याऐवजी त्याचे हात-पाय तोडून त्याला कायमचे अपंग करण्याचा विचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यासाठी सुपारी किलरची मदत घेता येईल का, याबाबत रितेश हंगे याने चौकशी केल्याचा आरोप आहे. रितेश हा चेतनचा मित्र असून दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही होते.

18 जून रोजी लोहगड परिसरात केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला तो दरीत पडल्याने मृत्यू झाल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा निष्कर्ष समोर आला. या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोषारोपपत्रातील पुराव्यांच्या आधारे पुढील सुनावणी होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >