वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते खेर्डा दरम्यान एका शेतात भाजी बनवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका मजुराने आपल्या सहकारी मजुराची लोखंडी पहारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपीने मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कारंजा पोलिसांनी मध्य प्रदेशातून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. (Washim Crime News)
Solapur Crime News : गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या दोन वृद्धांच्या प्रेमसंबंधाचा धक्कादायक शेवट झाला आहे. प्रियकराने आपल्या सुनेबद्दल अपशब्द ...
कारंजा येथील संतोष तिडके यांच्या शेतात मध्य प्रदेशातील दिनेश उईके आणि युवराज बोरखडे हे दोन मजूर कामाला होते. रविवारी दोघांनी मद्यपान केल्यानंतर भाजी बनवण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. दिनेश उईके हा युवराज बोरखडे याला केवळ पोळ्या न करता भाजी बनवण्यास वारंवार सांगत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद वाढला. संतापलेल्या दिनेश उईके याने आपल्या नात्यातील सहकारी मजूर युवराज बोरखडे याच्यावर लोखंडी पहारीने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर शेतात खड्डा खोदून त्याचा मृतदेह पुरला आणि तो तेथून पसार झाला.(Washim Crime News)
दरम्यान, दुसऱ्या दिवशी शेतमालक संतोष तिडके शेतात गेले असता त्यांना दोन्ही मजूर दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी दोघांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवराज बोरखडे याचा मोबाईल बंद होता, तर दिनेश उईके फोन उचलत नव्हता. अनेकदा संपर्क साधल्यानंतर दिनेश उईके याने संतोष तिडके यांना युवराज बोरखडे याची हत्या करून त्याचा मृतदेह पुरल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला. (Washim Crime News)
दिल्ली : दिल्लीतील कालकाजी मंदिर परिसरातून अल्पवयीन मुलीवर अत्यावर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलीला आणि तिच्यासोबत असलेल्या ...
या घटनेची माहिती मिळताच शेतमालक संतोष तिडके यांनी कारंजा शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शेतातील खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणातील आरोपी दिनेश उईके याला कारंजा पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे दोन मजुरांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत. (Washim Crime News)