Tuesday, September 22, 2026

बुरखा आणि नकाबवर या देशात पूर्णपणे बंदी, मुस्लिमबहुल देशातही चेहरा झाकण्यावर निर्बंध, जाणून घ्या सविस्तर

बुरखा आणि नकाबवर या देशात पूर्णपणे बंदी, मुस्लिमबहुल देशातही चेहरा झाकण्यावर निर्बंध, जाणून घ्या सविस्तर

इटलीत बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी संसदेच्या पटलावर एक विधेयक मांडलं जाणार आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शाळांमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. यासाठी लवकरच कायदा येईल, असं त्यांनी पक्षाच्या युवा संमेलनात स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा बुरख्यावर बंदी घालण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. इतर देशांप्रमाणे इटलीही हा कायदा लागू करण्याच्या तयारी सुरू असल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यापूर्वी कोणत्या देशांनी बुरखा आणि नकाबवर बंदी घातली यावरून चर्चा सुरू आहे. खरं तर याची सुरूवात 2011 मध्ये झाली होती. फ्रान्सने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि नकाबवर बंदी घातली होती. सार्वजनिक सुरक्षा, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक सलोख्याचं कारण पुढे करत फ्रान्सने हा कायदा लागू केला होता.

फ्रान्सनंतर 2011 या वर्षात बेल्जियमने सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घातली होती. चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्याचं लोण त्यानंतर इतर युरोपिय देशातही पसरलं. युरापातील काही देशांमधये चेहरा झाकण्यावर पूर्ण किंवा अंशत: बंदी लागू केली गेली. स्वित्झर्लंडने तर राष्ट्रीय जनमत घेऊन बुरखा आणि चेहऱ्या झाकण्याऱ्या कपड्यांवर बंदी घातली. हा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू झाला आहे. नेदरलँडमध्ये शाळा, हॉस्पिटल, सार्वजनिक वाहतुकीत चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी आहे. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, बुल्गारिया, लक्झमबर्ग आणि पोर्तुगालमध्ये वेगवेगळ्या कायद्यांतर्गत चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी आहे.

आशियाई देशातही बंदी

आशिया खंडातील काही देशात बुरखा आणि नकाबवर बंदी आहे. यात मुस्लिमबहुल देशांचाही समावेश आहे, हे विशेष. कझाकिस्तानमध्ये चेहरा झाकण्यावर बंदी आहे. ताझिकिस्तन आणि उझबेकिस्तानमध्ये बुरखा आणि चेहरा झाकणाऱ्या इतर धार्मिक कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेतही 2019 मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर चेहरा झाकण्याऱ्या कपड्यांवर बंदी आहे. चीनच्या शिनजियांग भागातही हा कायदा लागून आहे. किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तानमध्ये अशीच बंदी आहे. अझरबैजाननेही शैक्षणिक संस्थांमध्ये असे निर्बंध लादले आहेत.

अफ्रिकन देशातही कायदा लागू

अतिरेकी हल्ले झाल्यानंतर अनेक अफ्रिकन देशांनी चेहरे झाकणाऱ्या कपड्यांवर बंदीचा कायदा पारित केला आहे. चाड आणि कॅमरून 2015 साली झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर हा कायदा तात्काळ लागू केला. इतकंच काय तर अफ्रिकेतील मुस्लिमबहुल देश असलेल्या ट्यूनिशियातही 2019 मध्ये सरकारी संस्थानं आणि कार्यालयात बुरखा घालण्यावर बंदी आहे. गॅबॉन, कांगो गणराज्य आणि सेनेगलमध्येही अशीच बंदी आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >