India GDP growth : भारताच्या आर्थिक प्रगतीला मोठी झेप; फिच रेटिंग्जकडून भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजात मोठी वाढ, नेमकी वाढ किती ?

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीज (Moody's) नंतर आता फिच रेटिंग्स (Fitch Ratings) ने देखील भारताच्या आर्थिक विकासाबाबतचा आपला दृष्टिकोन अधिक सकारात्मक केला आहे. फिचने चालू वित्त वर्ष 2026-27 साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.४ टक्क्यांवरून थेट ६.९ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. एजन्सीने एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील मजबूत आर्थिक वाढीचा आणि अर्थव्यवस्थेच्या एकूण मजबुतीचा हवाला देत हा अंदाज वर्तवला आहे.(India GDP growth)



मजबूत आर्थिक वाढ आणि आव्हानांवर मात


फिचने स्पष्ट केले आहे की, चालू वित्त वर्ष 2026-27 मध्ये देशाचा एकूण जीडीपी विकास दर 6.9 टक्के राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी जून महिन्यात फिचने 6.4 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता. विशेष म्हणजे, एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली आहे. 2026च्या पहिल्या सहामाहीत व्यापाराच्या अटींमध्ये मोठी घसरण झाली असताना आणि अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या धक्क्यांदरम्यान देखील भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवलेली लवचिकता आणि मजबुती खरोखरच कौतुकास्पद असल्याचे फिचने म्हटले आहे.(India GDP growth)



खासगी गुंतवणूक आणि कर्जाला वाढती मागणी


रेटिंग एजन्सीच्या मते, आगामी काळात खासगी गुंतवणुकीच्या शक्यता अधिक मजबूत दिसत असून, गुंतवणुकीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याचा अंदाज आहे. याशिवाय, जुलै महिन्यात बिगर-अन्न कर्जाची वाढ वार्षिक आधारावर 19 टक्के नोंदवली गेली, जी व्यावसायिक उलाढालीची गती दर्शवते. मात्र, फिचने असा देखील अंदाज वर्तवला आहे की, उर्वरित वित्त वर्षात भारताच्या आर्थिक वाढीचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता असू शकते.(India GDP growth)



आरबीआयच्या धोरणांवर नजर


मजबूत देशांतर्गत मागणी, किमतींमध्ये वाढ आणि प्रतिकूल पुरवठ्याशी संबंधित घडामोडी लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ करून तो 5.5 टक्के करू शकते, असा अंदाज फिचने व्यक्त केला आहे.(India GDP growth)



गेल्या आठवड्यात मूडीज रेटिंग्सनेही भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 6 टक्क्यांवरून वाढवून 7 टक्के केला होता. मागील वित्त वर्ष 2025-26 मध्येही भारताचा जीडीपी 7.8 टक्के दराने वाढला होता. या सर्व जागतिक रेटिंग्सच्या सुधारित अंदाजांमुळे जागतिक पटलावर भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.किंग खान लालबागच्या राज्याच्या दर्षनासाठी सहा परिवार दाखल


Comments
Add Comment

India Canada relations : भारत-कॅनडाचे संबंध सुधारणार? डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध पुन्हा रुळावर येत असून, एक मोठी बातमी समोर आली आहे.

IPO Investment : एलिवेट कॅम्पसेसचा २,१०० कोटी रुपयांचा आयपीओ खुला; पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख कोणती?

नवी दिल्ली: शैक्षणिक संस्थांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट सेवा पुरवणाऱ्या एलिवेट कॅम्पसेस लिमिटेड (Elevate Campuses

Minor Student Case : शिक्षकी पेशाला काळिमा! अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या 'त्या' नराधम शिक्षकाला बेड्या

मुंबई: शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मुंबईतील माता रमाबाई मार्ग पोलीस ठाणे हद्दीतून

Amit Satam : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेत १.२५ लाख चिमुकल्यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांनी भूषवलेल्या घटनात्मक पदाला २५ वर्षे

Pune Ganesh Visarjan : पुण्यातील गणोशोत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय, घरून बाहेर पडण्यापूर्वी हे रस्ते नक्की तपासा

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठे बदल

Minister Girish Mahajan : पिंपळगावजवळ दोन ट्रकची धडक, जखमींच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन ताफा थांबवून घटनास्थळी; बचावकार्यात केली मदत

Nashik Accident News : दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री तथा