Asian Games 2026 : मिराबाई चानूची सुवर्ण भरारी : आशियाई क्रीडा स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई
September 23, 2026 01:52 PM
Asian Games 2026 (2)
नवी दिल्ली : भारताची स्टार वेटलिफ्टर मिराबाई चानूने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात तिने चमकदार कामगिरी करत रौप्य (Silver) पदक आपल्या नावावर केले. या शानदार विजयामुळे तिच्या आजवरच्या थक्क करणाऱ्या कारकिर्दीत अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकाची मोलाची भर पडली आहे. या स्पर्धेत उतरण्यापूर्वी मिराबाईच्या नजरेसमोर एक मोठे ध्येय होते, कारण याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला पदक मिळवता आले नव्हते. २०१४ च्या स्पर्धेत तिने नववे स्थान मिळवले होते, तर २०१८ च्या खेळांमधून दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर २०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळेस तिने जुन्या अपयशावर मात करत पदक जिंकूनच दाखवले.
Raigad Crime News : आई-वडिलांमधील घरगुती वाद मिटवण्यासाठी मध्ये पडलेल्या २४ वर्षीय मुलाचा वडिलांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगड ...
">ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मिराबाईने आयची-नागोया (Aichi-Nagoya) येथील स्पर्धेत उतरण्यापूर्वी ग्लासगो येथे सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) सुवर्ण पदक पटकावले होते. या जबरदस्त फॉर्मच्या जोरावर आशियाई खेळांमध्ये पदक जिंकून सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील पदकांचा संच पूर्ण करण्याची उत्तम संधी तिच्याकडे होती आणि तिने ती संधी सोनेरी ठरवली. मिराबाईच्या या ऐतिहासिक रौप्य पदकामुळे भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमधील पदकाची तब्बल २८ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. यापूर्वी १९९८ च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत दिग्गज खेळाडू कर्णम मल्लेश्वरी यांनी भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले होते, त्यानंतर आता मिराबाईने हा पराक्रम करून दाखवला आहे.
हे रौप्य पदक मिराबाई चानूच्या अत्यंत यशस्वी आणि देदिप्यमान कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. तिच्या खात्यात आधीपासूनच ऑलिम्पिकमधील रौप्य पदक, जागतिक विजेतेपद (World Championship) आणि राष्ट्रकुल खेळांमधील अनेक सुवर्ण पदके जमा आहेत. आता त्यात आशियाई क्रीडा स्पर्धेच्या या मानाच्या रौप्य पदकाचीही भर पडली आहे.