Raigad Crime News : आई-वडिलांचा वाद सोडवायला गेला अन् भलतंच घडलं; बापाने मुलाची केली निर्घृण हत्या

Raigad Crime News : आई-वडिलांमधील घरगुती वाद मिटवण्यासाठी मध्ये पडलेल्या २४ वर्षीय मुलाचा वडिलांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे घडली आहे. वडिलांनी धारदार चाकूने मुलावर वार केल्याचा आरोप असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव साहिल ऊर्फ सई सचिन चिकणे (वय २४) असे आहे. तर या प्रकरणी त्याचे वडील सचिन बजरंग चिकणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.



नेमकं काय घडलं ?


चिकणे कुटुंबीय मूळचे पोलादपूर तालुक्यातील ओंबळी येथील रहिवासी असून सध्या लोहारे देऊळकोंड येथील एका इमारतीत राहत होते. घटनेच्या दिवशी सचिन चिकणे आणि त्यांची पत्नी संध्या चिकणे यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू झाला. वाद वाढत असल्याचे पाहून साहिलने मध्यस्थी करत वडिलांना शांत करण्याचा आणि परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार, याच वेळी सचिन चिकणे यांनी स्वयंपाकघरातील धारदार चाकू घेत साहिलवर हल्ला केला. या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.


घटनेनंतर आरोपी सचिन चिकणे घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.दरम्यान, मृत साहिलची आई संध्या चिकणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलादपूर पोलीस ठाण्यात सचिन चिकणे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी शोध घेत त्याला काही वेळातच ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

गर्भवती महिलांसाठी मोठी बातमी! कामा रुग्णालयाचा मोठा निर्णय, सुट्टीच्या दिवशीही 'ही' महत्त्वाची सेवा राहणार सुरू

मुंबई: मुंबई आणि उपनगरांमधून उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांसाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. अनेक

दिवाळीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या 26 जादा फेऱ्या; 21 नोव्हेंबरपर्यंत विशेष सेवा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून हार्दिक पांड्या बाहेर; पुनरागमन लांबणीवर!

आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार

धक्कादायक! ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या हवामानाचा महा-यू टर्न; हवामान खात्याचा मोठा इशारा!

महाराष्ट्रात सध्या नोव्हेंबर महिन्याचे दिवस सुरू असून, हवामानात सतत होणारे बदल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Indian Army Fact Check: चीनने अरुणाचल प्रदेशात 50 किमी भूमी बळकावली? नेमकं सत्य काय?

चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना पराभूत करून अरुणाचल प्रदेशात सुमारे ५० किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतल्याच्या

कर्करोगविरोधी औषधांच्या किमतीत मोठी कपात! 9 नोव्हेंबरपासून नवे दर लागू; रुग्णांची वर्षाला ₹3,502 कोटींची बचत

नवी दिल्ली : कर्करोगाच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय