'अयोध्येत या, पण आधी माफी मागा', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अखिलेश सिंह यादव यांच्यावर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात निवडणुकांचं वारं फिरायला लागलं आहे. 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश सिंह यादव हे अयोध्येत येणार आहेत. या दौऱ्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हल्लाबोल केला आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. समाजवादी पार्टी नेते अखिलेश सिंह यादव 12 डिसेंबर रोजी आपल्या कुटुंबासह रामनगरीला भेट देणार आहेत. दुसरीकडे, दिवाळी सणानिमित्त अयोध्या लाखो दिव्यांनी उजळून निघाली आहे. अयोध्येत सलग दहा वर्षे दीपोत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत आले होते. अयोध्या सुवर्णयुगाची आठवण करून देते आणि आजची अयोध्या पुन्हा जिवंत होत आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. श्री राम हे भारताचा आत्मसन्मान आहेत. ज्या वैभवासाठी कारसेवक आणि संतांनी प्राणांचे बलिदान दिले. आता तेच वैभव पुन्हा मिळवण्याचा आज अयोध्या प्रयत्न करत आहे. असं सांगताना समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश सिंह यादव यांच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी टीकास्त्र सोडलं. अयोध्येत एकेकाली रामभक्तांवर गोळीबार, लाठीचार्ज आणि त्यांचा छळ केला होता, असं सांगत अखिलेस सिंह यांच्यावर हल्लाबोल केला.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश सिंह यादव यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणाले, 'जेव्हा ते लोक कथेला उपस्थित राहतात, तेव्हा त्यांना कथेचे शिष्टाचारही समजत नाहीत, ते त्याला मुशायरा समजतात. पूर्वी अयोध्येत निर्बंध होते, कोणीही येत नसे. कोणीही 'जय श्री राम'चा जयघोष करत नसे. आज, जे लोक रामाच्या विरोधात वकिलांची फौज उभी करत असत, ते त्यांचे अस्तित्व मान्य करत आहेत. हीसुद्धा आमच्यासाठी एक मोठी जमेची बाजू आहे. येथे कथेला स्वतःची प्रतिष्ठा आणि पवित्र परंपरा आहे, परंतु त्यांच्या बेबंद स्वभावामुळे ते रामाची प्रतिष्ठा आणि कथेची पवित्रता याकडे दुर्लक्ष करतात आणि तिला मुशायराच्या कक्षेत आणून अपवित्र करण्याचा प्रयत्न करतात.'


...आधी माफी मागावी


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की, "ज्यांनी रामभक्तांना धमक्या दिल्या, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, संतांचा अपमान करून त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांनी अयोध्येत नक्कीच यावे, पण माफी मागितल्यानंतरच यावे. त्यांनी रामभक्तांची माफी मागावी, त्यांनी संतांची माफी मागावी, त्यांनी आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करावा."

 
Comments
Add Comment

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा; ‘दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नाही, तर अंधारावर मात करणारा संकल्प!’

नवी दिल्ली : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला आणि जगभरातील भारतीयांना

भारतीय हवाई दलाने रचला इतिहास! IL-76MD विमानाने केले लडाखमधील न्योमा येथे जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक उंचीवरील लँडिंग

भारतीय हवाई दलाने अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. IAF ने पुन्हा एकदा आपली क्षमता जगाला दाखवून दिली आहे. IL-76MD या

35 हजार स्वयंसेवक प्रज्वलित करणार 30 लाख दिवे, अयोध्या नगरीत प्रस्थापित होणार 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड'

अयोध्या: प्रभू श्रीरामाची पावन भूमी असलेल्या रामनगरी अयोध्येमध्ये यंदाचा दहावा दीपोत्सव आजवरचा सर्वाधिक भव्य

BMW Gift to Son: मुलाला नववीत चांगले गुण मिळाल्यामुळे वडिलांनी गिफ्ट म्हणून दिली आलिशान कार; किमंत ऐकून व्हाल चकित

BMW Gift to Son: मुंबईत एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाईटमन म्हणून काम करणाऱ्या एका तांदूळ व्यापाऱ्याने आपल्या निववीत

Vasundhara Police Station : गाझियाबादच्या पोलीस ठाण्यात मोठा स्फोट; उपनिरीक्षकासह डिलिव्हरी बॉय जखमी

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील वसुंधरा पोलीस ठाण्यात अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात खळबळ

आंध्र प्रदेशात 'मुरासू' चक्रीवादळाचा हाहाकार; 8 जणांचा मृत्यू, तब्बल 1900 कोटींहून अधिकचे अवाढव्य नुकसान!

अमरावती: आंध्र प्रदेशात 'मुरासू' (Murasu) चक्रीवादळाने अभूतपूर्व विध्वंस घडवला असून संपूर्ण राज्यात मानवी जीवनासह