Crime News : ‘जिल्हा केसरी’ पैलवानाची भररस्त्यात हत्या ! जुन्या निवडणूक वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

Crime News : उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात ३५ वर्षीय ‘जिल्हा केसरी’ पैलवानाची भररस्त्यात हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक निवडणुकीतील जुना वाद आणि कौटुंबिक वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे. या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मृत पैलवानाचे नाव ब्रह्मानंद यादव असे आहे. ही घटना खलीलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोसाईपूर गावात घडली.



जनावरांसाठी चारा आणायला निघाले अन् 


ब्रह्मानंद यादव हे आपल्या पाळीव जनावरांसाठी चारा आणि खाद्य आणण्यासाठी दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. याचदरम्यान रस्त्यात दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांना अडवून हल्ला केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड फेकल्याचा आरोप आहे. त्यामुळे ब्रह्मानंद यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते खाली पडले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि गोळीबारही केल्याचा दावा करण्यात आला आहे.



भावावरही हल्ल्याचा आरोप


ब्रह्मानंद यांना वाचवण्यासाठी त्यांचा भाऊ घटनास्थळी धावून गेला. मात्र, हल्लेखोरांनी त्याच्यावरही गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याने काही अंतरावरून संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या ब्रह्मानंद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पैलवानाच्या हत्येची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी खलीलाबाद बायपासवर मृतदेह ठेवून रस्ता रोको आंदोलन केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.



काही संशयित ताब्यात; तीन पथके तैनात


पोलीस अधीक्षक संदीप कुमार मीना यांच्या माहितीनुसार, कौटुंबिक वाद आणि स्थानिक निवडणुकीतील जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. हत्येमागील नेमके कारण, सहभागी आरोपी आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Nashik Ganesh Visarjan 2026 : कुंभमेळ्याच्या कामांमुळे यंदा पंचवटी कारंजा येथे मुख्य मिरवणुकीचा समारोप

Nashik Ganesh Visarjan 2026 : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा परिणाम यंदाच्या गणेश विसर्जन

जसप्रीत बुमराहची 'जपानी उशी' सोशल मीडियावर चर्चेत! काय आहे खासियत

भारतीय पुरूष संघ एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी जापान दौऱ्यावर आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने जापान विरुद्ध

Kartik Aaryan Lalbaugcha Raja : राष्ट्रीय पुरस्कार मिळताच कार्तिक आर्यन थेट 'लालबागच्या राजा'च्या चरणी! घेतला बाप्पाचा आशीर्वाद!

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनने (Kaartik Aryan) त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि पहिला

Eknath Shinde : मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ वर्षांत ३० लाख घरे बांधणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे भूमिपूजन मुंबई : मुंबईसह महानगर

Nandurbar : अक्कलकुवा नवोदय विद्यालयातील १५ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय

Mahayuti Seat Sharing : पाच मतदारसंघ, अनेक दावेदार; महायुतीत जागावाटपाची कसोटी

पदवीधर-शिक्षक मतदारसंघांमध्ये हालचालींना वेग; पाचही जागांवर उमेदवारीवरून मित्रपक्षांमध्येच चुरस मुंबई (सुहास