Devendra Fadnavis : दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर, शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार

दुष्काळी भागांतील दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; रब्बी पिकांसाठीही मदत, पाणी-चाऱ्याचे नियोजन


मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन येत्या दोन दिवसांत दुष्काळाचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी पिके घेण्याची शक्यता असल्यास त्यासाठीही मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात लातूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.


मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर असून १९७२ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मागील काळात ६४ टक्के पाऊस झाला होता, तर यंदा ५० टक्के पाऊस झाला आहे, असा उल्लेख त्यांनी केला. पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून ती कायदेशीर तरतुदीनुसार केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान सरसकट झाले असल्याने मदतही सरसकट करण्याचा सरकारचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.



लातूर जिल्ह्यातील पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही पीक उगवले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. ‘थोडा धीर ठेवा, लवकर मदत करू. या संकटात तुम्ही एकटे नाही,’ असा विश्वास त्यांनी दिला.


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार असून रोजगारनिर्मितीची कामेही सुरू केली जातील. पुढील तीन-चार महिने आव्हानात्मक असतील. या काळात एकमेकांना मदत करून परिस्थितीतून मार्ग काढावा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. ( Maharashtra Government)


कर्जमाफीचे काम सुरूच

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे काम सुरू असून ते पूर्ण होईपर्यंत सरकार थांबणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. कर्जमाफीची रक्कम दिली जाईल, तसेच दुष्काळाची मदतही लवकरात लवकर खात्यात जमा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय शेतकऱ्यांचे ४८ हजार कोटी रुपयांचे जुने वीजबिल माफ करण्यात आले असून ही थकबाकी पुन्हा वसूल केली जाणार नाही, असा दावा त्यांनी केला.


लातूरवर सर्वाधिक परिणाम

मराठवाड्यातील दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम लातूरवर झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातील चारा आणि पाण्याचे नियोजन करण्यात आले असून कोल्हापूर आणि सांगली येथून पाणी आणण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले. आवश्यक ती आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळाच्या काळात सरकार सर्व शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.


शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

- लातूरच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका शेतकऱ्याने आपल्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. बोलताना त्याला अश्रू अनावर झाले. दुष्काळाने शेती उद्ध्वस्त झाल्याने आता हातात काहीच उरले नसल्याचे सांगत त्याने मदतीची आर्त विनंती केली.
- शेतकऱ्याची अवस्था पाहून फडणवीस यांनी त्याला धीर दिला. “काही काळजी करू नका. आम्ही आहोत. तुम्हाला काही होऊ देणार नाही. सगळं नीट करू. पाहणी करतोय, मदतही देऊ. काही कमी पडू देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.
- लातूरच्या औसा आणि निलंगा तालुक्यांतील पाहणीदरम्यान सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हिरव्या दिसणाऱ्या शेंगांमध्येही दाणे नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले. “हे संकट मोठे आहे. १९७२ नंतर इतका मोठा दुष्काळ या जिल्ह्यात पाहायला मिळतो,” असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Raj Thackeray : जाती-पातीत अडकू नका, शिक्षणव्यवस्थेतील दोषांवर प्रश्न विचारा ! साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे यांची भूमिका

विद्यार्थ्यांना आंदोलनाची दिशा भरकटू न देण्याचे आवाहन मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे या २० वर्षीय

Maharashtra Weather : मान्सूनच्या परतीच्या काळात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह 13 राज्यांना हवामान विभागाचा इशारा

मुंबई : यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात पावसाने

Ketan Agrawal Case : दुख:त कसं रडायचं? Google अन् ChatGPT वर सर्च; लोणावळ्यातील 'ती' घटना सुध्दा अभ्यासली, सिया गोयलच्या सर्च हिस्ट्रीने केली पोलखोल

पुणे : लोणावळा येथील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात आता अनेक अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Sunetra Pawar : दुष्काळी स्थितीमुळे राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबिर पुढे ढकलले

- नाशिकमध्ये २७ सप्टेंबरला होते नियोजन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय मुंबई : दिवंगत अजित पवार

Maharashtra Government : दिव्यांग पाल्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची तीन वर्षांची अट रद्द

- कायमस्वरूपी अपंगत्वासाठी प्रमाणपत्र एकदाच; तात्पुरत्या अपंगत्वासाठी पाच वर्षांनी प्रमाणपत्र सादर करण्याची