कधी होईल आयपीएल 2027 मिनी लिलाव?
आयपीएल 2024, 2025 आणि 2026 लिलाव प्रक्रिया विदेशात पार पडली होती. दुबई, जेद्दा आणि अबू धाबीत खेळाडूंवर बोली लागली होती. चेअरमन अरूण धूमल यांनी सांगितलं की, बोर्डाने विचार करूनच यंदाची लिलाव प्रक्रिया भारतात करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नसराईच्या काळात मोठ्या शहरातील हॉटेल आणि ठिकाणांची मोठी मागणी असते. त्यात मिनी ऑक्शन फार वेळखाऊ नसते. त्यामुळे गोवा हे ठिकाण निवडलं गेलं आहे. आयपीएलचे चेअरमन अरुण सिंह धूमल यांच्या मते, लिलावासाठी डिसेंबरच्या तारखेचा विचार केला गेला आहे. याचं आयोजन 15 ते 16 डिसेंबरच्या आसपास होण्याची शक्यता आहे. मिनी लिलाव असल्याने खेळाडूंवर बोली लावण्याची प्रक्रिया एका दिवसात संपून जाणार आहे.
वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असून तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेची भारतीय क्रीडाप्रेमींना प्रचंड ...
एका दिवसात संपणार लिलाव प्रक्रिया
आयपीएल स्पर्धेत दर तीन वर्षांनी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडत असते. आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव झाला होता. त्यानंतर आयपीएल 2026 साठी मिनी लिलाव झाला होता. आता आयपीएल 2027 साठी मिनी लिलाव होणार आहे. मेगा लिलावात शेकडो खेळाडूंवर बोली लागते. त्यामुळे त्याला ती प्रक्रिया वेळखाऊ असते. तसं मिनी लिलावात नसतं. मिनी लिलावात आधीच संघ बांधलेला असतो आणि त्यात दोन तीन खेळाडूंची मिनी लिलावातून भरणा केली जाते. दहा फ्रेंचायझी आपल्या संघातील रिकाम्या या लिलाव प्रक्रियेतून भरतील.